Congress Political | शुक्रवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सर्व उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून काँग्रेसच्या वाट्याला जवळपास 105 जागा येण्याची शक्यता आहे. काँग्रेसने गुरुवार दि. 24 ऑक्टोबर रोजी 48 उमेदवारांची यादी जाहीर केली असून उर्वरित 57 उमेदवारांची घोषणा शनिवारी होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीत अजूनही काही जागांवर एकमत होऊ न शकल्याने मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे.
Political News | कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक आमने-सामने; एकमेकांची कॉलर पकडत जोरदार हाणामारी
काँग्रेस 105 जागा लढवणार?
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली असून या बैठकीला काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य उपस्थित होते. मविआमध्ये सध्या काँग्रेस राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेकडे 90-90-90 जागांचे सूत्र निश्चित झाल्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. परंतु काँग्रेस 105 जागांवर लढण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या काही जागा पुन्हा काँग्रेसला मिळाव्या याकरिता प्रयत्न सुरू असून रामटेक (शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष) व नागपूर पूर्व (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष) या दोन मतदारसंघांचा समावेश आहे.
एकमत न झाल्यास मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता
तसेच काही मतदारसंघांवर एकमत न झाल्यास महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती यातून समोर आली आहे. तर लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात शिवसेना व काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांमध्ये लढत झाली होती. यामध्ये काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील निवडून आले होते. विधानसभेतही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असून विदर्भातील वरोरा-भद्रावती मतदारसंघातील खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पसंतीच्या उमेदवाराला विरोध असल्याने या मतदारसंघात देखील काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम