नविन संकट! ‘या’ आजाराचा वाढतोय संसर्ग, पशुपालकांना अधिक धोका

0
16

जगभरातील मंकीपॉक्स आणि कोरोनाव्हायरसची प्रकरणे अजून संपलेली नाहीत, की आता एका विशिष्ट प्रकारच्या तापाची प्रकरणे वाढू लागली आहेत. त्याला क्रिमियन-काँगो हेमोरेजिक फीव्हर म्हणतात. इराकमध्ये आतापर्यंत 111 हून अधिक रुग्ण आढळले असून 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इराकच्या आरोग्य मंत्रालयाचा दावा आहे की इराकी कुर्दिस्तानची राजधानी एरबिलमध्ये 17 वर्षीय रुग्णामध्ये या काँगो तापाचा पहिला रुग्ण आढळला होता. रुग्णाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

क्रिमियन-काँगो हेमोरेजिक फीव्हर याला काँगो फीव्हर असेही म्हणतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. काँगो तापाचा विषाणू गुरांच्या अंगावरील गोचिडीच्या चाव्याव्दारे पसरतो. तो या विषाणूचा वाहक आहे. त्याच्या संसर्गामुळे 40 टक्क्यांपर्यंत मृत्यू होण्याचा धोका आहे. त्याची बहुतेक प्रकरणे आफ्रिकन देशांमध्ये नोंदवली जातात. आतापर्यंत यासाठी कोणतेही विशिष्ट औषध किंवा लस तयार करण्यात आलेली नाही, त्यामुळे त्याचा धोका अधिक गंभीर असू शकतो. इराकमध्ये 1979 मध्ये हे पहिल्यांदा उघड झाले होते. इराकी मीडियाच्या अहवालानुसार, येथील संसर्गग्रस्त रुग्ण नाकातून रक्तस्त्राव झाल्यानंतर वेदनांनी मरतात.

युरोपमध्ये आढळले पहिले प्रकरण

काँगो तापाचे पहिले प्रकरण 1944 मध्ये युरोपातील क्रिमिया देशात नोंदवले गेले होते, म्हणून सुरुवातीला तो क्रिमियन हेमोरॅजिक फीव्हर म्हणून ओळखला जात होता, परंतु 1956 मध्ये काँगोमध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढला, त्यामुळे त्याचे पूर्ण नाव क्रिमियन-काँगो हेमोरॅजिक फिव्हर झाले.

ही आहेत लक्षणे

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, अचानक ताप येणे, स्नायू, मान, पाठ आणि डोके दुखणे ही त्याची सुरुवातीची लक्षणे आहेत. याशिवाय उलट्या, पोटदुखी, घसा खवखवणे, जुलाब, काही समजण्यास असमर्थता यासारखी लक्षणेही दिसतात. सुमारे 2 ते 4 दिवसांनंतर, लक्षणे अधिक तीव्र होतात. हृदय गती वाढते, लिम्फ नोड्स वाढतात आणि घसा, नाक किंवा तोंडातून रक्तस्त्राव होतो. त्यामुळे अनेक रुग्णांची किडनी निकामी तर काहींचे यकृत निकामी होते.

कसा पसरतो हा आजार

गोचिड चावल्यामुळे किंवा हा आजार झालेल्या जनावराच्या रक्ताचा मानवाशी संपर्क आल्याने या विषाणूचं माणसात संक्रमण होऊ शकतं. आतापर्यंत हा आजार झालेल्यांमध्ये जनावरांशी संबंधित व्यवसाय करणार म्हणजे शेतकरी, पशूपालक, कत्तलखान्यातील कामगार आणि पशुतज्ज्ञ मोठ्या प्रमाणात समावेश होता, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. या आजाराच्या रुग्णाच्या रक्ताशी, घामाशी किंवा अवयव व शरीराशी इतरांचा संपर्क आल्यास या आजाराचा प्रसार होण्याचा धोका जास्त असतो.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here