मनसेच्या सभेला औरंगाबाद पोलीसांकडून अटी

0
27

मनसे अध्यक्ष राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेण्याची घोषणा केली.त्यानंतर या सभेसाठी सर्व मनसे कार्यकर्ते कामाला जोरदार सुरुवात केली आहेत. राज ठाकरे यांना १ मे रोजी नियोजित ठिकाणी सभा घ्यायची असेल तर त्यांनी त्यांना तारीख बदलण्याची अट औरंगाबाद पोलिसांनी केली आहे.

मनसेच्या या सभेला पोलिसांकडून अद्याप पर्यंत परवानगी देण्यात आली नाही. महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेण्याचे संकेत आहे. या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता मनसेने व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी १ मे ला सभेची तारीख जाहिर केली आहे. त्यानंतर दोन दिवसांनी रमझान ईद आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभुमीवर, सभा नियोजित ठिकाणीच घ्यायची असेल तर अटी घातल्या आहेत.

सभेच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी १ मे ला सभेची तारीख बदला नाही तर सभा रमजान नंतर घ्या, अशी अट औरंगाबाद पोलिसांनी घेतली आहे. या सभेत राज ठाकरे यांनी काही आवाहन केल्यास आणि तणाव निर्माण झाल्यास त्याचा प्रश्न निर्माण होईल शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. प्रशासनाने शहरामधील पर्यायी ठिकाणी सभा घ्यावी असे सुचविले असले तरी पदाधिकारी मात्र राज यांच्या घोषणेनुसार मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावरच सभा घेण्यावर आग्रही आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here