Common cat snake : पुण्यात आढळला हा अतिदुर्मिळ साप

0
27

Common cat snake : पुणे शहरात असलेल्या पिंपरी चिंचवड मधील एका अपार्टमेंटमध्ये अतिदुर्गम मानला जाणारा मांजरा साप आढळून आला आहे.

पिंपरी चिंचवड मधील एका सोसायटीत हा अतिदुर्गम म्हणून ओळखला जाणारा मांजऱ्या साप आढळून आला आहे. याआधी अशा प्रकारचा साप परिसरात किंवा शहरात आढळून न आल्याने पुणेकरांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं होतं. मात्र घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षकांनी घटनास्थळी धाव घेत हा साप ताब्यात घेतला आहे.

*कसा असतो मांजऱ्या साप*

मांजरा सापाला कॉमन कॅट स्नेक असं म्हणून देखील ओळखलं जातं. हा साप फिकट राखाडी किंवा पिवळसर रंगाचा असतो. मांजऱ्या सापाच्या शरीरावर गडद तपकिरी किंवा काळी नागमोडी नक्षी असते. या सापाच्या डोक्यावर काळे तपकिरी अशा रंगाचे लहान ठिपके आणि डोळ्याच्या मागे पासून जबड्यापर्यंत काळी तिरकस रेष असते. या सापाच्या पोटावर पांढरे व त्यावर कळ्या रंगाचे काळे लहान ठिपके असतात. या सापाचं डोकं मानेपेक्षा मोठं असतं आणि लांब शेपूट असून त्याचे डोळे देखील मोठे असतात.

हा साप शक्यतो घनदाट जंगले, दाट झाडी अशा ठिकाणी आढळून येतो. अत्यंत दुर्मिळ असलेला हा साप झाडाच्या ढोलीत दगडाखाली किंवा बांबूच्या बेटांमध्ये आढळून येतो. या सापाच्या दिसण्याचे प्रमाण हे रात्रीच्या वेळी अधिक असतं. चुकून जरी या मांजऱ्या सापाला डीवचल तर तो शरीराचे वेटोळे करून समोरच्यावर हल्ला करतो आणि शेपटीच टोक उंच करून जोर जोरात हलवतो.

हा साप निम विषारी असून याचे विषारी दात हे जबड्याच्या मागील बाजूस असतात. या सापाचे विषारी दात हे जबड्याच्या मागील बाजूस असल्याने तो आपला बचाव करत असताना क्वचितच विष टोचतो. यामुळे या सापापासून मानवांना धोका नसल्याचं मानलं जातं. लहान पक्षी, उंदीर, पाल, सरडे यांसारखे अन्न हा साप खातो. झाडावर चढण्यात हा साप सराईत असतो. तर हल्ला करताना तो फुत्कारतो देखील.

मात्र विषारी समजल्या जाणाऱ्या फुरसा सापासारखाच हा साप दिसत असल्याने अनेकदा हा साप ओळखण्याय चूक देखील होऊ शकते. अनेक वर्षानंतर पुण्यात हा साप आढळून आल्याने या सापाला बघण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here