व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात; घरगुतीला मात्र दिलासा नाही

0
27

नवी दिल्ली – गॅस सिलिंडर सेवा पुरवठादार कंपन्यांनी आज १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांपर्यंत मोठी कपात केली आहे. १४.२ किलोचा घरगुती गॅस सिलिंडर मात्र जुन्या किंमतीतच उपलब्ध असणार आहे, त्यामुळे महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांना ऐन सणासुदीत कुठलाही दिलासा मिळाला नाही.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती जाणून घ्या 

आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर दिल्लीत ९१.५० रुपयांनी, कोलकात्यात १०० रुपयांनी, मुंबईत ९२.५० रुपयांनी तर चेन्नईमध्ये ९६ रुपयांनी स्वस्त झाला आहे. नव्या दरानुसार आता व्यावसायिक गॅस सिलिंडर दिल्लीत १,८८५ रुपये, कोलकात्यामध्ये १,९९५ रुपये, मुंबईत १,८४४ रुपये आणि चेन्नईमध्ये २,०४५ रुपयांना मिळणार आहे.

मात्र गत जुलैपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच सामन्यांचा घरगुती गॅस सिलिंडर आहे त्याच किंमतीत मिळेल. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत १,०५३ रुपये, कोलकात्यात १,०७९ रुपये, मुंबईत १,०५२ रुपये, चेन्नईमध्ये १,०६८ रुपये इतकीच राहणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here