Sanjay raut : ठाकरे गटाच्या प्रवक्ते आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटामध्ये प्रवेश केला. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती मध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. नीलम गोरे यांच्या ठाकरे गटातून जाण्याने हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. यातच आता संजय राऊत यांनी नीलम गोर्हे यांच्यावर कडव्या भाषेत टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, नीलम गोर्हे यांना पाच वेळा आम्ही आमदार केले, त्यांना मिळालेले वैधानिक पद शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळालं होतं असं असतानाही त्यांनी सोडून गेल्याबद्दल लाज वाटते आणि महाराष्ट्राला सुद्धा नीलम गोर्हे यांच्या बद्दल लाज वाटत आहे. चार ते पाच महिन्यांसाठी आपलं पद वाचावं म्हणून गोर्हे यांनी पक्ष सोडला अशा लोकांना आम्ही श्रद्धांजली वाहतो.
याचबरोबर महाराष्ट्राच्या 11 कोटी लोकांच्या मनातील साकड घालायला मी आलो आहे. राज्याची ओळख साधू संतांची भूमी नसून आता गद्दारांची भूमी म्हणून होत आहे. त्यामुळे ही ओळख पुसण्याची पांडुरंग शक्ती देवो, यशवंतराव तसेच अनेक महापुरुषांच्या नावाने ओळखला जाणारा महाराष्ट्र आता गद्दार यांच्या नावाने ओळखला जातोय. हुकूमशाही, दडपशाही पैशांच राजकारण, राज्यात सुरू आहे. यासाठी सर्व घटकांनी एकत्र यावे असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत. संजय तर आमच्यामुळे राज्यसभेत गेले आहेत त्यांनी लोकांमधून आपल्या पदाचा राजीनामा देऊन लोकांमधून निवडून यावं निवडणूक लढवावी अस आव्हान शिंदे गटाच्या आमदारांकडून संजय राऊत यांना केलं गेल आहे. यावर प्रतिउत्तर देत असताना मी कोणतीच निवडणूक लढवणार नाही, माझ्या पक्षाने मला राज्यसभेत पाठवलं, माझ्या पक्षाचे नेतृत्व मी करत असतो मी माझ्या पक्षाची बाजू मांडतो असं त्यांनी स्पष्ट केलं
तर चार दिवस उलटूनही अजित पवार गटाच्या मंत्र्यांना खाती देण्यात आली नाही. त्यावरून अजित पवार यांना टोला लगावत असताना भाजपच्या तंबूत जाऊन तिकडं राहणं सोपं नाही. एकटी शिवसेनाच आहे 25 वर्ष राहून बाहेर पडली असल्याचं त्यांनी खोचकपणे म्हटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम