द पॉईंट नाऊ ब्युरो : अमली पदार्थ हे देशाचे भविष्य देशोधडीला लावतात. मात्र त्यातून मिळणाऱ्या अमाप पैशापायी त्याची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या आयात होते. आता गुजरात मध्ये तब्बल 500 कोटींचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.
गुजरातच्या मुंद्रा बंदरावर एका जहाजातून तब्बल 52 किलो कोकेन जप्त करण्यात आले. महसूल गुप्तचर संचनालयाने (DRI) ही कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमली पदार्थांना मोठ्या प्रमाणावर किंमत आहे. यामुळे या अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते. मात्र गुजरातमध्ये इराणमधून आयात करण्यात आलेले हे तब्बल 500 कोटींचे कोकेन जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
जहाजात 25 मेट्रिक टनच्या एक हजार मिठाच्या बॅगा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र महसूल गुप्तचर संचनालयाने कारवाई करत हे तब्बल 500 कोटींचे कोकेन जप्त केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम