मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंधनावरील करात कपात केली आहे. त्यामुळे पेट्रोल ५ रुपये तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील.
मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती, त्यात हा मोठा निर्णय घेण्यात आला. शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. त्यामुळे आता पेट्रोल प्रती लिटर पाच रुपये आणि डिझेल प्रती लिटर तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचं त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी बहुमत चाचणी जिंकल्यानंतर तशी घोषणा केली होती, त्यावर आज हा निर्णय घेण्यात आला.
पत्रकार परिषदेत सरकारने घेतलेले आणखी काही निर्णय
१. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची निवडणूक आता थेट जनतेमार्फत होणार.
२. बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार.
४. आणीबाणी काळात तुरुंगवास भोगावा लागणाऱ्या लोकांना पेन्शन योजना पुन्हा सुरू करणार.
४. राज्यातील ग्रामपंचायत सरपंचाची निवड ग्रामपंचायतीच्या थेट निवडणुकीतून होणार.
५. राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० मोहीम राबविणार.
६. नियमित कर्जाचे हफ्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम