रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले ‘एकनाथ’…

0
32

मुंबई – सांगली मिरज येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करण्याची व गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या अपघाताची माहिती घेत या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ काल एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत एक पीकअप जीप घुसली, त्यात १४ वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज शासकीय आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत, गरज पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे. त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी आवश्यक तो खर्च उचलण्याची तयारीदेखील त्यांनी दर्शवली. या अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांना लागतील ते सर्व उपचार देऊ असे डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे यंदाच्या वारीला गालबोट लागले असते. मात्र वारकऱ्यांच्या मदतीला खुद्द ‘एकनाथ’ धावून आल्याने सर्वसामान्यांच्या मदतीसाठी तत्पर असलेला मुख्यमंत्री अशी शिंदे यांची ओळख नव्याने अधोरेखित झाली आहे. तसा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here