ठाणे – धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या सानिध्यात मी गेली अनेक वर्ष काम केले. त्यांचा आदर्श, शिकवण आणि कार्यपध्दती आज ही माझ्या डोळ्यासमोर आहेत. दिघे साहेब यांची भावना होती, की या पदावर ठाण्यामधील माणूस असावा. म्हणून आज त्यांच्याच आशीर्वादामुळे मी राज्याचा मुख्यमंत्री बनलो आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यात धर्मवीर दिघेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आज मुख्यमंत्री झालो आहे, त्यामागे धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने झालो.
तमाम जनतेच्या भावनांमुळे मला खुप मोठी जबाबदारी पेलण्याची संधी मिळाली आहे. धर्मवीर दिघेसाहेबांच्या सानिध्यात मी अनेक वर्षे काम केले. साहेबांची एकच भावना होती की, या पदावर ठाण्याचा माणूस असावा. हे सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. पद कोणते मिळाले हे बघण्यापेक्षा जनतेची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम