मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर; यांच्याकडे असणार नाशिकचे पालकत्व !

0
13

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. ज्यात काही मंत्र्यांचा अपवाद वगळता अनेक मंत्र्यांना जवळपास दोन ते तीन जिल्ह्यांचा कार्यभार देण्यात आला आहे.

दरम्यान, आज जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांच्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्याचे पालकत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

तर नाशिकचे पालकमंत्री म्हणून मालेगावचे आमदार दादा भुसे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्रीपद देण्याची सर्वात जास्त शक्यता होती. त्यांना धुळे, लातूर व नांदेड ह्या तीन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली

राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर

सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया

चंद्रकांत दादा पाटील – पुणे

विजयकुमार गावित – नंदुरबार

गिरीश महाजन – धुळे, लातूर, नांदेड

गुलाबराव पाटील – बुलढाणा

दादा भुसे – नाशिक

संजय राठोड – यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे – सांगली

संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत – रत्नागिरी, रायगड

तानाजी सावंत – परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग

अब्दुल सत्तार – हिंगोली

दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर

अतुल सावे – जालना, बीड

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे

मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन महिना उलटूनही पालकमंत्र्यांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी सरकारला घेरले होते. तसेच, पालकमंत्री नसल्याने अनेक कामे रखडल्याचाही आरोप विरोधकांकडून केला जात होता. मात्र, अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्याने जिल्ह्याचे विविध प्रश्न लवकर मार्गी लागतील.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here