शहराची पहिली महिला SDM अपूर्वा यादव ! असा आहे इंजिनियर ते अधिकारी बनवण्याचा प्रवास

0
16

The point now – असं म्हणतात की जर एखाद्याने योग्य दिशेने कठोर परिश्रम केले तर तो स्वतःचे नशीब स्वतः लिहू शकतो आणि मेहनतीच्या जोरावर काहीही साध्य करू शकतो. मैनपुरी शहरातील पहिल्या महिला एसडीएम अपूर्वा यादव यांनी हे सत्य सिद्ध केले आहे.

उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात वाढलेला अपूर्वा यादव यूपी पीसीएस परीक्षेत तीन वेळा नापास झाल्या त्यानी पण हार मानली नाही. ती सतत मेहनत करत राहिल्या आणि अखेर चौथ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले .आणि त्या मैनपुरी शहरातील पहिल्या महिला एसडीएम बनली.

अपूर्वाने त्यांचे संपूर्ण शिक्षण हिंदी माध्यमाच्या शाळेतून केले पण त्यांना इंजीनियरिंग करायचे होते. त्यासाठी इंग्रजी येणं आवश्यक होतं मग काय त्यांनी स्वप्नं साकार इंग्लिश शिकल्या आणि अथांग प्रयत्न केले.

टीव्हीवर इंग्रजी कार्यक्रम पाहायला सुरुवात केली, कादंबऱ्या वाचायला सुरुवात केली. कोणतीही लाज न बाळगता तुटलेली वाक्ये इंग्रजीत बोलू लागल्या. प्रयत्न करत राहिल्यास काहीही शिकता येते यावर त्यांचा विश्वास होता. यानंतर त्यांनी इंजिनीअरिंग केले आणि टीसीएसमध्ये नोकरी करू लागल्या .

टीसीएसमध्ये तीन वर्षे नोकरी करत असताना त्यांना अमेरिकेला जावे लागले.संधी मिळाली तिथे त्यांना देशसेवेची कल्पना सुचली आणि त्यांनी नागरी सेवेची तयारी करण्याचे ठरवले. ते नागरी सेवा परीक्षेसह उत्तर प्रदेश पीसीएसची तयारी सुद्धा केली.

तीन वेळा त्यांना यात यश मिळू शकले नाही मात्र चौथ्या प्रयत्नात तिला यश मिळाले. अपूर्वाने उत्तर प्रदेश PCS 2016 परीक्षेत 13 वा क्रमांक मिळवला आणि मैनपुरीची पहिली महिला SDM बनल्या. याच्यावरून हे साध्य होते की जर आपण अथांग प्रयत्न केले तर अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते फक्त त्या चिकाटीने काम करणे महत्त्वाचे आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here