तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला ? काळजी करू नका, हे पोर्टल करेल तुमचे काम…

0
12

मुंबई : आजकाल राज्यासह देशभरात मोबाईल चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. कारण, आजकालचे मोबाईल हे एकप्रकारे आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे.

ह्या मोबाईल मधून आपण रोज अनेकांशी संवाद साधतो, आतातर विविध ठिकाणी ह्या फोनद्वारे आपण रोज दैनंदिन व्यवहार करत असतो. मात्र, हाच मोबाईल जर हरवला किंवा चोरीला गेला, तर आपल्यासारखे अनेक जण अस्वस्थ होतात. कारण, जर कोणी आपल्या फोनमधून काही गैरप्रकार केले तर ह्याचा भुर्दंड आपल्याला सोसावा लागतो. यासाठीच केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने अलीकडेच CEIR पोर्टल सुरु केले आहे. ज्यावरून ह्या पोर्टलच्या सहाय्याने आपण हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल ब्लॉक करू शकतो. केवळ इतकेच नाही, तर तुमचा मोबाईलही परत मिळु शकतो.

हा पोर्टल सुरु करण्यामागचा उद्देश :

देशात दररोज हजारो मोबाईल चोरीला जात असतात. मात्र, याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवूनही मोबाईल मिळण्याची शक्यता कमी असते. तसेच, चोरांकडून या मोबाईलमधील डेटाचा गैरवापरही केला जाऊ शकतो. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने चोरीला गेलेले किंवा हरवलेले स्मार्टफोन ब्लॉक करण्यासाठी या CEIR पोर्टलची निर्मिती केली आहे.

यासाठी नागरिकांनी काय करावे ?

१. मोबाईल हरवल्यास/चोरीला गेल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.

२. जे सिमकार्ड चालु आहे ते ब्लॉक करावे व त्याच नंबरचे दुसरे सिमकार्ड सुरु करुन घ्यावे. आणि तेच सिमकार्ड CEIR वर रजिस्ट्रेशन करीता वापरावे.

३. http://www.ceir.gov.in/Home/index.jsp या वेबसाईटला भेट देऊन लॉगिन करावा.

४. Block Stolen/Lost Mobile यावर क्लिक करुन आवश्यक ती माहिती भरावी (मोबाईल नंबर, IMEI नंबर, मोबाईल कंपनी, बिलाची तारीख, सध्याचा  फोन नंबर, इ.) व Submit बटनवर क्लिक करावे.

५. खालील कागदपत्र सोबत जोडावी (सॉफ्टकॉपीची साईज 500 kb पेक्षा कमी असावी) :

  • पोलीस स्टेशनला केलेली तक्रारीची प्रत
  • प्रत मोबाईल खरेदी बिल
  • कोणतेही शासकिय ओळखपत्र (आधार कार्ड, वोटर आयडी, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इ.)

६. सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुमच्या चालू नंबरवर एक OTP येईल. त्यानंतर आपल्याला तक्रार नोंदविल्याचा Request Number मिळेल.

७. त्यानंतर हरवलेला मोबाईल Active झाल्याची माहिती पोर्टलद्वारे रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे मिळेल व सदरची माहिती पोलीस स्टेशन येथे कळवावी.

पण जर तुमचा हरवला किंवा चोरीला गेलेला मोबाईल काही वेळाने सापडला पण तो ब्लॉक झाला असेल. तर तुम्ही ह्याच पोर्टलच्या मदतीने अनब्लॉक करू शकता. ते केल्यानंतर तुमचा मोबाईल पूर्वीप्रमाणे वापरता येईल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here