स्वप्निल आहिरे,
प्रतिनिधी : श्री क्षेत्र टाकळी ता.मालेगाव (नाशिक) येथे शिवसेवा वारकरी प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थापक श्री ह.भ.प.सचिनराजे महाराज पगार व ह.भ.प.परमेश्वर महाराज घाटे आळंदी यांच्या वतीने भव्यदिव्य शिवसेवा वारकरी अध्यात्मिक भव्य-दिव्य उन्हाळी बाल-सुसंस्कार शिबीराचे आयोजन दि.०५ मे पासून आजपर्यंत करण्यात आले होते .
या निमित्ताने बाल वारकरी मुलांना चांगले संस्कार हरिपाठ ,गायन, मृदुंग हार्मोनियम, व्यसनमुक्ती, ओव्या, ज्ञानेश्वरी, गाथा, किर्तन यासारख्या विषयावर अभ्यास व्हावा यानिमित्ताने मार्गदर्शनपर किर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती, शेवटी काल्याची किर्तन सेवा “युवाकिर्तनकार ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे चांदवड” यांची झाली .
याल तरी यारे लागे । अवघे माझ्या मागे मागे ।।
आजी देतो पोटभरी। पुरे म्हणाल तो वरी ।।
या श्री संत जगद्गुरू तुकोबांराय महाराज यांच्या अभंगावर उत्कृष्ट असे काल्याची चिंतन सेवा पार पडली.महाराज म्हणाले की,वारकरी संप्रदाय हा अनादी काळापासून चालत आला आहे,त्यामुळे यापुढेही आपल्याला याच संप्रदायाची कास धरून जीवनाचा उद्धार करणे गरजेचे आहे.आपले भाग्य आहे की आपण वारकरी संप्रदायाचे पाईक झालो,
कृता कृत्य झालो ।
इच्छा केली तो पावलो।
या संत वचनाप्रमाणे कारण कुठलाही संप्रदाय असो त्यात ०५ तत्वे असणे गरजेचे आहे देव, संत, ग्रंथ, तीर्थ, व्रत, हे पाचही तत्व फक्त आपल्या वारकरी संप्रदायातच आहे असे या वेळी नमूद केले. ते पुढे म्हणाले की माऊली श्री संत ज्ञानोबाराय व जगद्गुरू श्री संत तुकोबाराय यांच्या नावाने संप्रदाय शेकडो वर्षापासून चालत आहे ‘तेणेच पंथे चालू जाता ।।” या तुकोबारायच्या वचना प्रमाणे आपण चांगल्या आयुष्याच्या रस्ताने चालावे,भविष्यात अनावश्यक मोबाईल चा वापर टाळावा,व्यसनमुक्ती ही जीवनातील खरी सक्ती करून भविष्यात संपूर्ण भारत देश हा व्यसनापासून दूर घेऊन जाऊ शकतो असा आत्मविश्वास सर्वांनी दाखवला पाहिजे,किर्तनात भगवान गोपाळ श्रीकृष्णाचे चरित्र्य हे फक्त मुखाने उच्चार करावा व मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्रप्रभु यांचे चरित्र आपल्या जीवनात आणावे असेच पालकांकडून मुलावर चांगले वारकरी संस्कार घेणे गरजेचे आहे व मुलाच्या करिता वेळ देणे गरजेचे आहे यावेळी महाराजांनी सांगितले, आणि या दरम्यान श्री ह.भ.प.सचिनराजे महाराज पगार आळंदी येथे शिवसेवा वारकरी प्रतिष्ठान महाराष्ट्र संचलित आध्यत्मिक वारकरी शिक्षण बालसंस्कार संस्था आळंदी देवाची येथे ‘ज्यांचे आई-वडील कोरोनात मयत झाले त्यांच्या मुलांना १० वी पर्यत मोफत शिक्षण व ” ज्यांच्या आई वडिलांपैकी एक व्यक्ती कोरोनात मृत झाले असेल त्या विद्यार्थ्यांला अर्धी फी भरून १० वी पर्यत शिक्षण हे शिवसेवा वारकरी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येईल असे महाराजांनी जाहीर केलं’ या शिबिरात परिसरातील जवळपास ८५ दरम्यान मुलांनी सहभाग घेतला होता यावेळी गायनाचार्य ह.भ.प.गोकुळ महाराज देशमाने, देनेवाडी, ह.भ.प.नवनाथ महाराज अनकाई, ह.भ.प.भाऊसाहेब महाराज खांगाळ, कोलटेक, ह.भ.प.बंडू महाराज गांगुर्डे दिलीप महाराज खैरे,ह.भ.प.अनिकेत महाराज गांगुर्डे, ह.भ.प.सूर्यवंशी उपस्थित होते ही किर्तनसेवा ग्रामपंचायत टाकळी (सोनज) ता.मालेगाव चे उपसरपंच श्री अनिल नारायणराव वाघसाहेब व समस्त ग्रामस्थ मंडळ टाकळी (सोनज) यांनी आयोजित केली होती.
यावेळी परिसरातील सर्व वारकरी आदि भाविक उपस्थित राहून समस्त भजनी मंडळ यांनी अनमोल सहकार्य केले,तसेच सर्व बालगोपाल यांनी आग्रही युवाकिर्तनकार ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात व ज्यांनी या कार्यक्रमाला ज्यांनी योगदान व अन्नदान अर्पण केले त्यांना संस्थेतर्फे सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला कार्यक्रमानंतर काल्याच्या प्रसाद देऊन महाप्रसादाने भव्य दिव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली.
कमी वयातील मुलांकडे व्यसनमुक्तीसाठी अधिक सक्तीचे प्रयत्न करणे गरजेचे ती जबाबदारी पालकांची
गावागावात बाल संस्कार शिबिरांची काळाची गरज
उत्तम संस्कारित लहान पिढी ही भविष्यात आपल्या देशाच्या विकासाचा महत्वाचा कणा लहान मुलांनी मोबाईलचा अनावश्यक वापर टाळा पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज. लहान मुलांना योग्य असे उत्तम संस्कार हे फक्त वारकरी संप्रदायात मिळेल….
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम