छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे इगतपुरी रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित

0
36

राम शिंदे | सर्वतीर्थ टाकेद : शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार आत्मसात करून छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे यांनी सर्वाना एकत्र करून इगतपुरी तालुक्यात अनेक सामाजिक कामाने ठसा निर्माण केला आहे. काही दिवसा पुर्वी मुंढेगाव- अस्वली रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला अनेक गोरगरिबांना न्याय मिळाला आहे.

स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत असतात. त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन प्रहार सैनिक कल्याण वतीने त्यांना माजी सैनिक फुलचंद पाटील, विजय पवार, दिनकर पवार, गजानन पळशीकर, जगणाथ शिरसाठ, सार्जंट चौधरी वीर नारी विद्या ताई सानप, कविता साळवे, सुवर्णा ताई शिंदे यांच्या हस्ते इगतपुरी रत्न पुरस्कार देण्यात आला. प्रहार सैनिक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष विजय कातोरे, उपाध्यक्ष तानाजी चौधरी, कार्याध्यक्ष किसन हंबीर, सचिन शिंदे, नितीन चव्हाण, हरीश चौबे, महिला अध्यक्षा रेखाताई खैरनार, शैला पाचरने, आसाराम राठोड, नारायण उपाध्याय, रवींद्र शार्दूल, गुणाजी गांगड आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत कोरोना आजाराने धास्तावलेल्या ५०० पेक्षा जास्त कुटुंबाना किराणा व भाजीपाला वाटप करण्याचा छावाने पुढाकार घेेेतला होता त्याबरोबरच कोरोना काळात जीवाची पर्वा न करता गोकुळ धोंगडे यांनी वैद्यकीय क्षेत्रात अनेकांना उपचार मिळवून दिले. तालुक्यातील अनेक अपुऱ्या रस्तांचे निवेदन देऊन कामे मार्गी लावली. बेमोसमी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी योगदान दिले आहे. तालुक्यातील बस सेवा देखील सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा केला.

मराठा समाजातील अनाठायी खर्चा संबंधी जनजागृती देखील केली अशा वेगवेगळ्या कामांची दखल घेऊन प्रहार सैनिक कल्याण संघाने त्यांना पुरस्कार बहाल केल्याने तालुक्यातील सर्वच स्तरांतील व्यक्तींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. माजी सैनिकांच्या हातून मिळालेला पुरस्कार मिळाला याचे समाधान गोकुळ धोंगडे यांनी व्यक्त केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here