चांदवड शहरातील कॉलेजरोड बनले प्रेमीयुगलांचा अड्डा

0
44

विकी गवळी
चांदवड प्रतिनिधी: शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले व नेहमीच कॉलेज व शाळकरी विध्यार्थ्यांची गर्दीचे ठिकाण असलेले कॉलेजरोड या ठिकाणी रेणुका कॅम्पेलक्स व रॉयल कॅम्पेक्स मध्ये विविध प्रकारच्या शैक्षणिक खाजगी क्लासेस सुरू आहेत परंतु या ठिकाणी शाळकरी अल्पवयीन प्रेमीयुगल अनैसर्गिक कृत्य करतांना आढळून आले आहे.

या प्रेमीयुगलाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे, विध्यार्थ्यांच्या पालकांचे आपल्या मुलांकडे अजिबात लक्ष नाही असे दिसून येत आहे.मागील काळात याच काँम्पलेक्स मधील एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्यांनीचा विनयभंग झाला होता ते प्रकार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी समोपचाराने मिटवला होता सदर प्रकरण ताजे असतांना आता या शाळकरी प्रेमीयुगलांचे असे अनैसर्गिक कृत्ये या रॉयल व रेणुका कॅम्पेलक्स मध्ये आढळून येत आहे.

सदरचे प्रेमीयुगलांचे अनैसर्गिक कृत्ये वाढत चालले असून त्यावर खाजगी क्लास चालक उघडपणे डोळेझाक करत आहेत ग्रामीण भागातील नागरिक आपल्या मुलांना चांदवड शहरात चांगले शिक्षण मिळावे यासाठी पाठवत असतात परंतु विध्यार्थ्यांचे कोणतेही प्रकारे शिक्षणाकडे लक्ष नसून पालकांनी याची दखल घेणे आवश्यक आहे. सदर शहरातील ठिकठिकाणी सुरू असलेले अवैध कॅफे व मुलामुलींना अनैसर्गिक बसण्याचे ठिकाण बंद केले पाहिजे आता अशी मागणी नागरिक करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here