स्वातंत्र्यांचा अमृत मोहत्सव अंतर्गत गरोदर माता तपासणी शिबीर संपन्न

0
7

चांदवड: डॉ. भारती प्रविण पवार आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्दघाटन करण्यात आले . चांदवड तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय , चांदवड , प्राथमिक आरोग्य केंद्र वडाळीभोई , प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेरभैरव या ठिकाणी सदर शिबीर आयोजीत करण्यात आले होते.

सदर शिबिरात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांनी गरोदर महिलांची तपासणी केली , रक्त, लघवी व ईतर तपासणी करण्यात आल्या व सदर तपासणी दरम्यान दोष आढळून आलेल्या मातांना औषधोपचार करण्यात आले व सुखरुप प्रसुती होण्यासाठी समुपदेशन करण्यात आले . सदर शिबीरास एकुण १८१ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली सदर शिबीरास कुटूंब कल्याण प्रदर्शनाला ४४८ व्यक्तींनी भेट दिली .

सदर शिबीरास डॉ . भोये , उपसंचालक नाशिक विभाग नाशिक , लिना बनसोड ,मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक , डॉ .थोरात , जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय नाशिक , डॉ . कपिल आहेर , जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक , यांचे मार्गदर्शन लाभले सदर शिबीरात स्त्रीरोग तज्ञ डॉ.भागश्री जंजाळे , डॉ . निलेश आहेर , डॉ . विकास गांगुर्डे व ईतर कर्मचारी यांनी तपासणी केली .

सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी डॉ.सुशिलकुमार शिंदे , वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय चांदवड , डॉ . पंकज ठाकरे , तालुका आरोग्य अधिकारी व तसेच सर्व वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र चांदवड व उपजिल्हा रुग्णालय चांदवड तसेच सर्व आरोग्य कर्मचारी , आशा स्वयंसेविका यांनी विषेश परीश्रम घेतले .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here