उसवाड येथील जि. प. शाळेत पालक मेळावा संपन्न

0
33

चांदवड: उसवाड येथील जिल्हा परिषद शाळेत नुकताच पालक मेळावा आयोजित करून शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख पुंडलिक सोनवणे होते.

विद्यमान शालेय समितीची मुदत संपल्याने समितीचे पुनर्गठन करण्यासाठी शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे बहुसंख्य पालक उपस्थित होते. उपस्थित पालकांमधुन शासन निर्णयानुसार प्रत्येक संवर्गातून सर्वानुमते सर्वसमावेशक अशी समिती निवडण्यात आली.

यात महिलांनाही योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आले. नवनिर्वाचित सदस्यांमधुन खंडेराव वेताळ यांची अध्यक्षपदी तर उज्ज्वला बिडगर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.सदस्यपदी किरण पवार, नामदेव बटावे,अनिल गायकवाड, सचिन माळी, सविता पवार, नंदाताई पवार, दामिनी कापडणे यांचा समावेश आहे.

मेळाव्यास सरपंच संजय पवार, भारत अहिरे, नामदेव बटाव, मच्छिंद्र शिंदे, समाधान शिंदे, सोपान पवार, कौतिक पवार, नागेश बिडगर, शांताराम शिंदे, केशव बटाव, शांताराम पवार, अनिल बिडगर, आरती पवार, निशा पवार, नंदा पवार, दामिनी बिडगर, संगिता वेताळ यांसह बहुसंख्य पालक उपस्थित होते.

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुधाराणी सोनवणे, शिक्षक संगिता हिरे, सुनिता भदाणे, सविता भामरे, सुमिञा राऊत, संदीप हिरे, प्रशांत देवरे व दत्तात्रय चांडे यांनी परिश्रम घेतले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here