विकी गवळी
चांदवड- सदरील फोटो हा बोरसे गल्ली वरचे गाव येथील असून काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यांनातर स्ट्रीट लाईट त्याची क्लॅम्प सोडून खाली लोम्बकळत असून नगरपरिषद विद्युत विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
नगरपरिषद विद्युत विभाग कायमच चर्चेत असतो, काही दिवसांपूर्वी हाय मास्ट काढल्याचे प्रकरण गाजले होते. तसेच विद्युत तारांमधून झाडांच्या फांद्या घुसून बाहेर येत असल्याने वारा आल्यावर विद्युत वाहक तारा हलतात, या बाबीकडे सांगितल्याशिवाय लक्ष दिले जात नाही.
असो स्वच्छता विभागाने सुद्धा डास प्रतिबंधक फवारण्या करणे गरजेचे असून नगरपरिषद वाचनालया शेजारून नाला वाहत असून डास चावल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत
आताच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात आमदार प्रशांत बंब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार चांदवड नगरपरिषद हद्दीत सुद्धा तपासणी होणे गरजेचे असून नगरपरिषद मधील काही अधिकारी, कर्मचारी हे नाशिकहून ये जा करतात त्यामुळे शहरातील समस्यांकडे नीट लक्ष दिले जात नाही अशी खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. तसेच हे व्यक्ती मुख्यालयी राहत नसल्यास घरभाडे भत्ता नेमका कुठला घेत आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम