मनमाड तळेगाव रोही बस पूर्ववत सुरू, गाव विकास व भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या प्रयत्नांना यश

0
34

विकी गवळी
चांदवड प्रतिनिधी: भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अंबादास केदारे यांच्या मार्गदर्शनाने तळेगाव रोही गाव विकास व भ्रष्टाचार निर्मुलन समितीने जुन महिन्यात मनमाड – तळेगाव रोही मार्गे लासलगाव ,नाशिक बस सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नाशिक विभागीय अधिकारी श्री. कुंवर यांना निवेदन देण्यात आले होते. ही बस लवकरात लवकर सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा ही देण्यात आला होता.

सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आज अखेर मनमाड बस डेपो ने मनमाड-तळेगाव मार्गे लासलगाव नाशिक जाणारी बस सुरू करण्यात आली आहे. नाशिक विभागीय अधिकारी श्री.कुंवर साहेब यांनी मनमाड अगर प्रमुख यांना मनमाड -तळेगाव रोही मार्गे लासलगाव बस लवकरात लवकर सुरू करण्यात यावी असे आदेश पत्र काढले होते. त्यानुसार मनमाड बस डेपोचे अगर प्रमुख लाडवंजारी साहेब यांनी तात्काळता दाखवून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आज बस पूर्ववत सुरू करण्यात आली. तळेगाव रोही गाव विकास समिती व भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने बस चालक कातकाडे आणि वाहक सरवदे यांना शाल, पुष्पगुच्छ मधुकर वाकचौरे, विक्रम वाकचौरे, भागवत सोमवंशी यांनी देऊन सत्कार केला.

ह्यावेळी गाव विकास व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य कॉम्रेड सुखदेव केदारे, वेडू केदारे, बबनराव वाकचौरे, रविंद्र केदारे, धोंडीराम वाकचौरे , धनाजी मोरे, अशोक वाकचौरे, निवृत्ती शिंदे, बाबाजी पवार, भाऊसाहेब शिंदे, बाळू हिरे, दीपक मोरे, कैलास वाघ तसेच तळेगाव रोही भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष रविंद्र केदारे , गावातील विद्यार्थी -विद्यार्थिनी आणि शेतकरी-कष्टकरी व ग्रामस्थ उपस्थितांनी कॉम्रेड सुखदेव बाबा केदारे यांचाही सत्कार करून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अंबादास केदारे तसेच जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य अन्वर पठाण यांचे आभार व्यक्त करण्यात आले…


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here