चांदवडला बाप-लेकाच्या वादात डोक्यात पहार घालून एकाचा खून

0
20

विकी गवळी
चांदवड प्रतिनिधी: तालुक्यातील पाटे गावात पाटे शिवार गट नंबर ३९६ पाटे-नारायणखेडे ता.चांदवड जिल्हा नाशिक येथे आरोप वडील कारभारी रायबा ठोके व मयत मुलगा रवींद्र कारभारी ठोके दोघे एकत्र कुटुंबासोबत पाटे गावात राहत होते.

रात्री मयत रवींद्र दारू पिऊन घरी आला असता आरोपीस वडील कारभारी ठोके यांस विचारणा करित “माझं लग्न करून देणार आहे की नाही’ व आरोपी म्हणाला “आधी तु दारू बंद कर’ तेव्हा तो म्हणाला “मी दारू बंद करणार नाही’ तेव्हा तो म्हणाला “माझ्यासाठी आतापर्यत किती मुली बघितल्या ते मला सांगा’ असे म्हणून कुरापत काढून आरोपीस शिवीगाळ करून घरातील कोपऱ्यात ठेवलेली लोखंडी पहार घेऊन आरोपीस डोक्यात मारून डोके फोडून दुःखापात केली.

आरोपी याने मयत रवींद्र यास लोखंडी पाईप व पहारिने हातपायावर व डोक्यात जबर मारहाण केली त्यात तो मयत झाला. प्रकाश कारभारी ठोके यांनी चांदवड पोलीस स्टेशनला माहिती दिली व चांदवड पोलिसांत भदवि कलम ३०२,५०४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारावकर करीत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here