चांदवड पंचायत समिती समोर आशा स्वयंमसेविकांचा ठिया

0
37

विकी गवळी
चांदवड प्रतिनिधी : तालुक्यातील आशा स्वयंमसेविककांनी चांदवड पंचायत समिती कार्यालय समोर ठिया आंदोलन केले. कोरोना काळात सर्व आशा स्वयंमसेविककांनी कोरोना संपेपर्यत जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य एकनिष्ठतेने बजावले होते परंतु याची दखल पंचायत समिती शासनाने अजून पर्यत घेतली नसून तालुक्यातील सर्व आशा स्वयंमसेविककांना वंचित राहावे लागले आहे.

शासनाने पारित केलेला नवीन शासन निर्णयचे चांदवड पंचायत समिती प्रशासानने अजून पर्यत अंमलबजावणी केली नाही व तालुक्यातील सर्व स्वयंमसेविककांना मानधनापासून वंचित राहावे लागले आहे, त्यामुळेच स्वयंसेवीकानीं हे आंदोल केले केले असून जर लवकर शासन निर्णयची अंमलबजावणी केली नाही तर येणाऱ्या काळात मोठे आंदोलन उभे करू अशी आशा स्वयंसेविकांनी चांदवड पंचायत समितीला इशारा दिला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here