
देवळा ; जुलै-२०२३ मधील पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात चांदवड -देवळा मतदार संघात ९० कोटी ७४ लक्ष रुपयांच्या भरीव निधीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.डॉ. राहुल आहेर यांनी दिली.
पुरवणी अर्थसंकल्पात चांदवड तालुक्यातील (मिनी म्हाडा क्षेत्रात ) आदिवासी उपयोजना अंतर्गत लेखाशीर्ष 5054 अंतर्गत रस्त्यांच्या तसेच लहान पुलांच्या एकूण 10 कामांना 20 कोटी 63 लक्ष, तसेच देवळा तालुक्यातील रस्त्यांच्या व लहान पुलांच्या एकूण 26 कामांना 39 कोटी रुपये नाबार्ड-28 अंतर्गत चांदवड तालुक्यातील पुलांच्या व रस्त्याच्या 3 कामास 5 कोटी 96 लक्ष रुपये तसेच लेखा शीर्षक 3054 व 5054 अंतर्गत प्रमुख जिल्हा मार्ग तसेच राज्य मार्ग रस्त्यांच्या एकूण 13 कामांना 25 कोटी 15 लक्ष असे एकूण 90 कोटी 74 लक्ष रुपये मंजूर झाल्याने दळण वळणाचा प्रश्ण मार्गी लागणार असुन आ. डॉ.राहुल आहेर यांच्या पाठपुरव्यामुळे पावसाळी अधिवेशनात मंजुरी मिळाली आहे.
यात देवळा वाजगाव खर्डे कांचनबारी रस्त्याचीसुधारणा व घाट कटिंग करणे, पाटणे निंबोळा लोहोणेर विठेवाडी रस्त्यावर लहान पूल बांधणे, मेशी बाबा वाडी पिपळगाव ,भिलवाड ,कापशी , भावडे ,वडाळे, वाजगाव ,भऊर,खामखेडा रस्त्यावर संरक्षण भिंत बांधणे, पाईप मोरी बांधणे, सौदाणे ,देवळा ,कळवण ,सुरगाणा,वघई रस्त्याची जंक्शन सुधारणा करणे,दुभाजक बांधणे आदी कामांचा समावेश आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम