Chandryan 3 update : आज भारतीयांचे डोळे आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोट्टा येथील सतिश धवन अवकाळ तळाकडे लागले होते. भारताच्या अत्यंत महत्वकांक्षी चांद्रयान- 3 मोहिमेला आज प्रारंभ झाला असून ‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत ‘चांद्रयान-3’ चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले
भारताचे ‘चांद्रयान-3’ हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी दुपारी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले आणि भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली. ‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-3 वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावला.
आसमंत हादरवणाऱ्या रॉकेटच्या आवाजात टाळ्या- शिट्ट्यांसह ‘भारत माता की जय’च्या घोषणाही निनादल्या. श्रीहरीकोटा येथे देशभरातून आलेल्या आबालवृद्धांच्या समुदायाने भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांची आणि स्वदेशी तंत्रज्ञानाची कमाल ‘याची देहि याची डोळा’ अनुभवली. देशाच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला आणि ‘चांद्रयान-3’ चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम