Champa shashthi | आज ‘चंपाषष्ठी’च्या दिवशी असा करा देवाचा कुलधर्म

0
23
Champa shashthi
Champa shashthi

Champa shashthi | आज  मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी (Champa shashthi) असून, आज राज्यभरात हा दिवस खंडोबा देवाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. चंपाषष्ठीच्या दिवशी संपूर्ण राज्यभरातील खांडोबा देवाच्या मंदिरांमध्ये तसेच जेजुरी गडावर हा खंडोबाचा चांपाषष्टीचा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रासह कर्नाटकातील बहुतांश लोकांचा खंडोबा हा कुलदैवत आहे. अनेक घरांमध्ये चंपाषष्ठीच्या निमित्ताने जसे देवीचे नवरात्र तसेच खंडोबाचे षडरात्र साजरी केली जाते. तसेच संध्याकाळच्या वेळी घरात तळी भरून देवाला भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवतात.

भरीत भाकरीच्या नैवेद्याचे महत्त्व

चंपाषष्ठीच्या दिवशी कुलदैवताचा कुलधर्म करावा. तसेच, या दिवशी खंडोबाला नैवेद्य देखील अर्पण केला जातो. तसेच ह्या नैवेद्यात त्यात ठोंबरा, बाजरीच्या कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पाथीचा कांदा आणि लसूण ह्या पदार्थांचा समावेश असतो. ठोंबरा म्हणजे जोंधळे शिजवून त्यात दही, मीठ घालून केलेला पदार्थ ह्या सोबतच गव्हाच्या लोंब्या, हुरडा, तीळ तसेच गूळ हे पदार्थ एकत्र करून त्याचा दिवा लावावा. (Champa shashthi)

Spiritual news | उज्जैनच्या मंदिराचे अद्भूत रहस्य; मूर्ती प्राषण करते…

तळीचे महत्त्व

देवाला वरील नैवेद्य दाखवण्यापूर्वी पाच पुरुषांनी देवाची तळी भरायची असते. त्यानुसार एका ताम्हनात पान, पैसा, सुपारी, भंडार आणि खोबरे हे ठेवून तळी भरणाची विशेष आरती म्हणत ते ताम्हन तीनदा उचलून डोक्याला लाऊन खाली ठेवणे म्हणजेच ‘तळी भरणे’. खाली ठेवल्यानंतर हे ताम्हण उचलताना प्रत्येक वेळी ताम्हणात ठेवलेली भंडार भरलेली खोबऱ्याची वाटी मोडतात. मग दिवटी-बुधली घेत देवाची आरती करतात आणि मग जेजुरीच्या दिशेने चार पाऊले चालत जात भंडार उधळतात. याला लाक्षणिक अर्थाने  ‘जेजुरीला जाऊन येणे’ म्हणतात. आणि या नंतर ती दिवटी दुधाने विझवतात. (Champa shashthi)

Spiritual news | असे आहे कालभैरव जयंतीचे महत्त्व; वाचा सविस्तर

चंपाषष्ठी व्रत तिथी |(Champa shashthi)

ह्या मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचागानुसार १७ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.३३ वाजता ह्या तिथीला सुरुवात होते. तर, दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३.१३ वाजता ही तिथी संपणार आहे.

अशी आहे आख्यायिका

काही पौराणिक कथेनुसार, मणि आणि मल्ल ह्या दोन असुरांनी देव-ऋषींना त्रास दिला. त्यामुळे भगवान शंकरांनी खंडोबाचे रूप घेतले. आणि त्यानंतर मणि-मल्ल ह्या असुरांसोबत खंडोबा देवांनी युद्ध केले. दरम्यान, हे युद्ध सलग सहा दिवस सुरु असून, यात मणिने भगवान शिवाची क्षमा मागितली आणि आपला पांढरा घोडा त्यांच्या चरणी अर्पण केला.

(वरील सर्व माहिती ‘द पॉइंट नाऊ’ हे माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवते. यातून आम्ही कुठलाही दावा करित नाही.)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here