चांदवडला सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ; गळ्यातील चार तोळे सोन्याची पोत चोरीला

0
17

चांदवड: भुरट्या चोरांचा धुमाकूळ सद्या चांदवड सह देवळा व आजूबाजूच्या तालुक्यात सुरू असून पोलिस प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे गरजेचं असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. गेल्या वर्षभरापासून अनेक ठिकाणी सोन साखळी चोर, दुचाकी चोर यांची संख्या वाढली आहे.

चांदवड शहरातील फुले नगर येथे राहणाऱ्या सुरेखा त्रंबकराज जाधव या आपल्या फुलें नगर येथील टेलिफोन कॉलनी घरच्या परिसरातून पाई जात असतांना एका काळ्या रंगाच्या मोटर सायकलवरील अज्ञात इसमानी सुरेखा जाधव यांच्या जवळ येऊन मोटर सायकल उभी करून गळ्यातील चार तोळे सोन्याची पोत सुमारे १.३०,०००/- किमतीचीं जबरीने हिसकावून तोडून चोरून नेली.

सदर चोरांचा पळून जातांनाचा व्हिडीओ CCTV मध्ये कैद झाला असून. चांदवड पोलीस स्टेशनला १३४६/२०२२ भादवी कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस अंमलदार एस बी जाधव तपास करित आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here