नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानल्या गेलेल्या ‘सेंट्रल विस्टा’ प्रकल्पाचे आज उद्घाटन करणार आहे. राजधानीत दिल्लीत हा भव्य सोहळा पार पाडणार आहे.
ह्या प्रकल्पांतर्गत पंतप्रधान आज नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहे. तसेच राजपथचे कर्तव्यपथ असे नामकरण करणार आहे. उद्यापासून इंडिया गेट आणि कर्तव्यपथ पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करणार आहे.
राजधानी दिल्ली का सेंट्रल विस्टा एवेन्यू अब कहलायेगा "कर्तव्य पथ"। प्रधानमंत्री @narendramodi जी 8 सितंबर को करेंगे इसका लोकार्पण। देखिये इस नये और खूबसूरत प्रोजेक्ट की एक झलक।#AmritMahotsav #KartavyaPath #CentralVistaAvenue #CentralVista #MainBharatHoon pic.twitter.com/40r4Fr5gnu
— Amrit Mahotsav (@AmritMahotsav) September 7, 2022
हा प्रकल्प तब्बल वीस हजार कोटी रुपये इतका आहे, जो इंडिया गेटपासून राष्ट्रपती भवनापर्यंत विस्तारलेला आहे. यात नव्या संसद भवनासह अनेक सरकारी कार्यालयांचे पुनर्निर्माण करण्यात येणार आहे. आज ह्या प्रकल्पातील मोठ्या गार्डनचे उद्घाटन होणार असून हे गार्डन १४० नवीन झाडांसह १६.५ किमीचे मोठे फुटपाथ असणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम