द पॉईंट नाऊ ब्युरो : कोरोनाने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. चीन आणि दक्षिण कोरिया येथे अनेक शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे पुन्हा सर्व जगाची चिंता वाढवली आहे.
यामुळे भारतात केंद्र सरकार द्वारे सर्व राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतात सध्या कोरोनाच्या विळख्यातून काही प्रमाणात बाहेर पडून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र चीन-दक्षिण कोरियामधील परिस्थितीने चिंता वाढवली आहे.
याआधी चीनमधूनच संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. आणि आता पुन्हा इथे कोरोनामुळे परिस्थिती बिकट झालेली पाहायला मिळत आहे. याच कारणाने केंद्र सरकारने सर्व राज्यांना खबरदारी घ्यायच्या सूचना केल्या आहेत.
भारतात मागील दोन कोरोनाच्या लाटांनी बिकट परिस्थिती निर्माण केली होती. यामुळे मोठ्या प्रमाणावर फटका देशाला बसला. मात्र आता तरी सर्वजण काळजी घेतील. गाफील राहणार नाहीत. या दृष्टीने सूचना करण्यात आल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम