केंद्र सरकार येत्या ११ सप्टेंबरला पाळणार राष्ट्रीय दुखवटा

0
25

नवी दिल्ली – ग्रेट ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकार येत्या रविवारी (दि. ११) एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळणार आहे.

या दिवशी देशातील सर्व शासकीय आणि राष्ट्रीय इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार आहे. तसेच या दिवशी मनोरंजनाच्या कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार नाही, असे गृहखात्याकडून जाहीर केलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.

गुरुवारी मध्यरात्री महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले होते. १९५२ साली त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर आतापर्यंत म्हणजे सात दशके त्या ब्रिटनच्या राजसत्तेवर होत्या. कोरोनातून बऱ्या झाल्यानंतर मात्र वाढते वय व प्रकृती अस्वस्थेमुळे एलिझाबेथ यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांवरील उपस्थितींवर बंधने आली होती. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला होता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here