Car Under 15 Lakh: कार आपल्या दारात असावी हे स्वप्न प्रत्येकाचे असते मात्र गोंधळ हा माणसाला दिशा सूची देत नाही. देशात मोठ्या प्रमाणात कार प्रेमींची संख्या आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल कार वर होत असते. आपल्यासमोर अनेक पर्याय देखील उपलब्ध आहेत. मात्र आज आपण कमी बजेट मधील या टॉप 5 कार बघणार आहोत ज्या घेतांना आपल्याला समाधान वाटेल अन् बजेट देखील राखले जाईल.
Tecno POP 7 Pro: आज लाँच होईल, पालकांना भेटवस्तू देण्यासाठी एक चांगला पर्याय
कमी बजेट रेंजमध्ये येणाऱ्या कारमध्ये पहिला क्रमांक महिंद्रा थारचा आहे. या कारला देशात खूप पसंती मिळत आहे. ही 4 सीटर कार 1497 सीसी इंजिनसह येते आणि ती 9.99 लाख ते 16.49 लाख रुपयांपर्यंत खरेदी केली जाऊ शकते.
टाटाच्या सुरक्षित कारपैकी एक टाटा नेक्सॉन दुसऱ्या क्रमांकावर आहे. टाटाच्या या कारचा सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत समावेश आहे. ही 1497 CC कार 21.19 km/l पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. ही कार 7.80 लाख रुपयांपासून 14.30 लाख रुपयांपर्यंत खरेदी केली जाऊ शकते.
महिंद्राची नुकतीच लाँच झालेली आलिशान SUV कार Mahindra XUV700 या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ADAS सारख्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेल्या या 5 सीटर कारला 1999 CC चे इंजिन आहे. ही कार 13.45 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केली जाऊ शकते.
मारुतीची सर्वाधिक विक्री होणारी कार मारुती ब्रेझा चौथ्या क्रमांकावर आहे. मारुतीच्या या 5 सीटर कारमध्ये 1462 सीसी इंजिन आहे आणि ही कार 19.89 किमी/ली पर्यंत मायलेज देते. ही कार 8.19 लाख रुपयांपासून ते 14.04 लाख रुपयांपर्यंत खरेदी केली जाऊ शकते.
Hyundai ची जोरदार मागणी असलेली कार Hyundai Creta पाचव्या क्रमांकावर आहे. देशात या कारची प्रचंड क्रेझ आहे. या 5 सीटरला 1497 सीसी इंजिन आहे आणि ही कार 16.8 किमी/ली पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. ही कार 10.64 लाख ते 18.68 लाख रुपयांमध्ये खरेदी केली जाऊ शकते.
जर तुम्हाला कार घ्यायची असेल तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही कारण ही माहिती वाचून तुमचे समज गैरसमज दूर होतील. अन् आपल्या घराला शोभेल अशी कार तुम्ही बाजारातून आपल्या घरी आणू शकाल. आज तुमच्या मनातील गोंधळ दूर होऊन टॉप 5 कार आपल्या समोर आल्या आहेत. यापलीकडे देखील अनेक कार आहेत मात्र त्या सुरक्षेच्या दृष्टीने कमीअधिक प्रमाणात आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम