कारने घेतला अचानक पेट; पत्नीला प्रसूतीगृहाकडे नेताना दाम्पत्याचा होरपळून मृत्यू

0
17

एक गर्भवती महिला आपल्या पतीसह कारमधून जात होती. त्यावेळी कारने अचानक पेट घेतला. कार अचानक पेटल्यामुळे गर्भवती महिलेचा आणि तिच्या पतीचा जळून मृत्यू झाला आहे.

केरळमधील कन्नूर येथे एका महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्या. त्यामुळे या महिलेला कारमधून रूग्णालयात नेण्यात येत होते. त्याचवेळी कारला अचानक आग लागली. या घटनेत गर्भवती महिला आणि तिच्या पतीचा जळून मृत्य झाला आहे.

कार जळताना पाहून प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि कारला लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र ड्रायव्हर सीट आणि त्याशेजारील सीटवर बसलेले पती-पत्नी वाचू शकले नाहीत.

Milk Price : महागाईचा आणखी एक झटका! 

रिशा (२६) आणि प्रजित (३५) असे मृत जोडप्याचे नाव आहेत. कारमधून सुखरुप बाहेर पडलेल्या चौघांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमधील इतर चौघांना किरकोळ दुखापात झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारला आग नेमकी कशी लागली हे अद्याप याचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here