CAA Act | स्वातंत्र्य दिनी 54 सिंधी हिंदूंना 15 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय नागरिकत्व मिळाले. ‘आता आम्ही आणि आमचा धर्म भारत मातेच्या कुशीत सुरक्षित आहोत’, असे म्हणत यावेळी त्यांना अश्रु अनावर झाले. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) अंतर्गत या 54 हिंदूंना अखेर भारतीय नागरिकत्व मिळाले असून, या नव भारतीयांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच यावेळी त्यांनी आपल्यावर पाकिस्तानात झालेल्या अत्याचारांची कहाणी सांगत असताना अनेकजण ढसाढसा रडू लागले.
महाराष्ट्र सिंधी साहित्य अकॅडमी, राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, सिंधी कलाकार संगम व उल्हासनगर महानगरपालिका यांच्या वतीने ‘विभाजन विभाषिका स्मृती दिवस’ हा उल्हासनगर येथील सिंधी भवन येथे साजरा करण्यात आला. यावेळी या सर्व नव भारतीयांचा सन्मान करण्यात आला. ‘भारताच्या कुशीतच आपला धर्म सुरक्षित आहे’, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
Vidhansabha Election | सस्पेन्स संपणार; विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार..?
CAA Act | पाकिस्तानात मुलींचं जबरदस्तीने धर्मांतर केलं जातं
या नव भारतीयांनी आपल्यावर झालेल्या पाकिस्तानातील जाचक जीवनाची आणि आत्याचाराची कहाणी कथन केली. “पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांचा सतत छळ केला जातो. खंडणी व धर्मांतराचा त्रास त्यांना सहन करावा लागतो. तिथे हिंदू मुलींचं जबरदस्तीने धर्मांतर केलं जातं.”, हे सांगताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रु वाहू लागले.
या सर्वांना भारतीय सिंधू सभा या संघटनेने भारतीय नागरिकत्व मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असून, त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या 10 ते 15 वर्षांपासून नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या 150 लोकांपैकी 54 जणांना नवीन CAA कायद्यामुळे केवळ तीन महिन्यांतच नागरिकत्व मिळाले असून, उर्वरित अर्ज प्रलंबित आहेत आणि त्यांनाही लवकरच भारतीय नागरिकत्व मिळेल अशी आशा आहे.
काय आहे CAA कायदा
मोदी सरकारने संमत केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातील नवीन तरतुदीनुसार बांगलादेश, पाकिस्तान व अफगाणिस्तानातील बिगरमुस्लिम धर्मीय अल्पसंख्याक जसे की, हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध व पारसी यांना भारताचे नागरिकत्व दिले जाईल. त्यांच्याकडे उचित कागदपत्रे नसली, तरीही त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल.
VidhanSabha Election | विधानसभेचे फटाके दिवाळीनंतर..?; उशीरा निवडणुकीचा फायदा कोणाला..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम