Bus accident : राज्यातील अपघातांची मालिका संपताना दिसत नाहीये. बुलढाण्यात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचं ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. नियंत्रण सुटल्यानं ही बस राजूर घाटात पलटी झाली आहे. या बसमधून एकूण ५५ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. या अपघातामध्ये दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा आगाराची बस क्रमांक एमएच ०६ एस ८३७५ ही बस मलकापूर येथून बुलढाणा येथे जात असतांना या गाडीचा अपघात झाला. ही बस बुलडाणा जात असताना राजूर घाट प्रारंभ स्थळी चढताना रोडच्या बाजूला पलटी झाली. या बस मध्ये तब्बल ५५ प्रवासी प्रवास करत होते. या घटनेत बस मधील अंदाजे १० प्रवासानां किरकोळ मार लागला असून जखमीना उपचारसाठी जवळच्या दवाखान्यात पाठविले आहे. या बसचे ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मागील महिन्यामध्ये बुलढाणा येथील सिंदखेडराजा या ठिकाणी एसटी बसला अचानकपणे आग लागून जवळपास 23 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेला संपूर्ण राज्य हळूहळू होतं. गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये अपघातांच्या मालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम