नागपुरात कडक उन्हाळ्यात दुचाकी जळून खाक

0
32

राज्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने खडक उन्हाचे चटके बसत आहेत याच उन्हाळ्यात वाहनांचा देखील धोका आहे असाच एक प्रकार नागपुरात घडला आहे. बुधवारी दक्षिण नागपुरातील महाकाली चौकात उन्हात रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीने पेट घेतला. दिवसेंदिवस कडक उन्हाचा पारा वाढत चालला आहे.

दक्षिण नागपुरातील अमरनगरकडे जाणाऱ्या मार्गावर महाकाली चौक आहे. या चौकात नीलेश बाईक सर्व्हिस सेंटरच्या समोर प्लेझर ही गाडी उभी होती. दुपारी १२.५५ वाजताच्या सुमारास या दुचाकीने अचानक पेट घेतला. काही समजण्याच्या आत दुचाकीने भडका घेऊन पाच मिनिटांत ती जळून खाक झाली. या दुचाकीला कशामुळे आग लागली, याचे कारण समजू शकले नाही. मला पण काळ आली नव्हती नशिबाने यावेळेस त्या दुचाकीवर किंवा त्याच्याजवळ कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

कडक उन्हामुळे ही दुचाकी पेटली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी आजूबाजूला उभ्या असलेल्या नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केल्याने आग नियंत्रणात आली. इतर गाड्या खेळण्या जाण्यापासून वाचविण्यात नागरिकांना यश आले. ही गाडी एका महाविद्यालयीन युवतीची असल्याची माहिती आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here