Budget Nsk: राज्याच्या अर्थसंकल्पात नाशिकसाठी भरघोस निधी – दादाजी भुसे

0
38

Budget Nsk: राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला असून यात नाशिक जिल्ह्यासाठी देखील भरघोस निधी देण्यात आला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळणार आहे. नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने जिल्ह्याचा विकास आराखडा सादर करत जिल्ह्याला भरघोस निधी आणण्यात भुसे यांना यश मिळाले आहे. (Budget Nsk)

नाशिक रोडला होणार भव्य उद्यान….
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष असून या महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची राज्य शासनाने तरतूद केली असून यात आंबेगाव (पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी 50 कोटी रुपये निधी दिला आहे तर नाशिक, मुंबई, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्यानसाठी 250 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. यामुळे नाशिकरोड येथे महाराजांचे भव्य असे उद्यान उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मेहनत घेत या निधीसाठी पाठपुरावा केला आहे. तसेच शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय व शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धनासाठी 300 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे.

नदी जोड प्रकल्पासाठी भरघोस निधी…
या सोबतच जिल्ह्यासाठी महत्वाचे असलेले नदीजोड प्रकल्पानां देखील मोठी तरतूद केली आहे. यात दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून करण्यात येणार असून, नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोऱ्यातील पाणी वापरले जाणार आहे. यामुळे मुंबई, गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढण्यासाठी या पाण्याचा वापर होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तसेच संपूर्ण राज्याला या योजनेच्या माध्यमातून मोठा फायदा होणार आहे. विशेषतः मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. वैनगंगा खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना लाभ होणार आहे.

नाशिक साठी इकॉनॉमी पार्कची घोषणा….
राज्यातील युवकांना रोजगार मिळावा तसेच सक्षम, कुशल अन् रोजगारक्षम युवाशक्ती बेरोजगारीचा शिक्का पुसून त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून लॉजिस्टिक पार्क धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी नागपूर येथे 1000 एकरावर लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार असून नाशिक , नागपूर, एमएमआर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी असे 6 सर्क्युलर इकॉनॉमी पार्क असणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणाईला रोजगार उपलब्ध होणार आहे.

त्र्यंबकेश्र्वर देवस्थानचा होणार कायापालट…
त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या विकासासाठी भरघोस निधी…
राज्यातील अर्थ संकल्पात देवस्थानाच्या विकासा साठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानचा समावेश होण्यासाठी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पाठ पुरावा केला होता. या सोबत घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेसाठी भरघोस निधी….
नाशिक – पुणे प्रवासाचे अंतर कमी होण्यासाठी नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नाशिक साठी निओ मेट्रोची देखील घोषणा करण्यात आली आहे. नाशिकला जोडणाऱ्या समृध्दी महामार्गाचे काम देखील अंतिम टप्प्यात असून यामुळे दळवळनाच्या सुविधा सुककर होणार आहेत.

Sambhaji Raje in Deola: शेती परवड नाही म्हणून आम्ही विकतोय….

नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी जेजे करता येईल त्यासाठी भरघोस निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यातील उद्योग, धार्मिक स्थळे, नदीजोड प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान, नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे, निओ मेट्रो यासाठी अर्थ संकल्पात तरतूद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो.
मा. दादाजी भुसे, पालकमंत्री. नाशिक


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here