Budget 2024 | बजेटमध्ये महिला आणि शेतकऱ्यांसाठी काय..?

0
16
Budget 2024 Updates
Budget 2024 Updates

Budget 2024 |  आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या २०२४ -२०२५ या वर्षाच्या अंतरिम बजेटचे वाचन करत आहेत. यात त्यांनी आता पर्यंतच्या काही योजना आणि त्यांचा जनतेला झालेला लाभ अधोरेखित केला आहे. २०२४ हे निवडणुकांचं वर्ष असून, येत्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे आज सादर होत असलेल्या या मिनी बजेटकडून देशातील जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या. मोदी सरकार सामान्य जनतेला त्यांच्या पिटाऱ्यातून काय देणार याची उत्सुकता सर्वांना होती. दरम्यान, या अर्थसंकल्पात कोणासाठी काय घोषणा झाल्या ते पुढीलप्रमाणे… 

अशा आहेत घोषणा

१. देशात नव्या मेडिकल कॉलेजेसची स्थापना करण्यात येणार.

२. ९ ते १४ वर्षांच्या मुलींना ‘सर्व्हायकल कॅन्सर’ रोखण्यासाठी लस देण्यात येणार.

३. प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे पुढील ५ वर्षांत देशातील ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे ही बांधली जाणार आहेत.(Budget 2024)

४. १ कोटी महिला या ‘लखपती दीदी’ बनल्या असून, या अन्य महिलांसाठी प्रेरणा ठरल्या. या लखपती दीदीचे लक्ष्य हे २  कोटींवरून आता ३ कोटींपर्यंत वाढवण्यात आले आहे.

५. दुग्ध उत्पादकांसाठी नवीन योजना सुरू करणार असून, ‘किसान संपदा’ या योजनेतून ३८ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला असल्याचे अर्थमंत्र्यांनी अधोरेखित केले.

६. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आगामी ५ वर्षांमध्ये देशातील ग्रामीण भागात आणखी ३ कोटी घरे बांधली जाणार आहेत.

७. ७ लाखांपर्यंत कोणालाही कर लागत नाही.

८. तीन रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जाणार असून, पॅसेंजर रेल्वे गाड्यांचे कामकाज सुधारण्यात येणार आहे. मालवाहतूक प्रकल्पही विकसित केला जाणार असून, ४० हजार सामान्य रेल्वे डब्यांचे वंदे भारतमध्ये रूपांतरण केले जाईल.

Budget 2024 | ‘सबका साथ सबका विकास’; मोदी सरकार आज जनतेला काय देणार..?

Budget 2024 | बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?

१. शेतीसाठी आधुनिक साठवण करण्यात येईल.

२. पुरवठा साखळीवर भर देण्यात येईल.

३. सरकार मोहरी व भुईमूग लागवडीला आणखी प्रोत्साहन देणार.

४. मत्स्यपालन योजनांना चालना दिली जाईल.

५. सागरी अन्न निर्यातीत दुप्पटीने वाढवणार

६. ५ एकात्मिक ‘एक्वा पार्क’ उघडण्यात येईल. (Budget 2024)

अशा आहेत तरतूदी?

१. पुढील ५ वर्षांत गरीब लोकांसाठी २ कोटी घरं बांधण्यात येणार.

२. MSME साठी व्यावसाय सोपा करण्यासाठी काम केले जाईल.

४. सामान्य नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक क्षेत्र सज्ज आहे.

५. रूफटॉप सोलर प्लॅनच्या अंतर्गत १ कोटी घरांना प्रति महिना ३०० यूनिट फ्री वीज देण्यात येईल.

६.  दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लवकरच काही मोठ्या योजना आणणार.

Gold Silver Rate Today | बजेटपूर्वी सोने-चांदीच्या भावात मोठी अपडेट

महिलांसाठी काय?

१. महिला वर्गाला संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा करण्यात येईल.

२. प्रधानमंत्री आवास योजनेतील ७० टक्के घरं ग्रामीण भागातील महिलांना

३. महिलांसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठीचे लसीकरण वाढविनेट येणार असून, सर्व क्षेत्रांमध्ये ‘नॅनो DAP’ चा वापर वाढविण्यात येईल. (Budget 2024)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here