Budget 2024 | आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या २०२४ -२०२५ या वर्षाच्या अंतरिम बजेटचे वाचन करत आहेत. यात त्यांनी आता पर्यंतच्या काही योजना आणि त्यांचा जनतेला झालेला लाभ अधोरेखित केला आहे. २०२४ हे निवडणुकांचं वर्ष असून, येत्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे आज सादर होत असलेल्या या मिनी बजेटकडून देशातील जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. आता मोदी सरकार सामान्य जनतेला त्यांच्या पिटाऱ्यातून काय देणार हे पहावे लागणार आहे. या अर्थसंकल्पात महिलांसाठी काही खास घोषणा होण्याची शक्यता आहे. काय म्हणाल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण…
Budget 2024 | काय म्हणाल्या केंद्रीय अर्थमंत्री..?
१ . ‘पंतप्रधान स्वनिधी योजने’मुळे अनेकांना लाभ मिळाला. २५ कोटी लोकांसाठी आम्ही विविध योजना राबवल्या. पीएम किसान योजनेचा ११. ८० कोटी लोकांना मोफत धान्यवाटप करनेत आले आहे.
२. मोदी सरकारने राबवलेल्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. २०४७ पर्यंत भारत हा एक विकसित देश असेल. यात विशेषतः गरीब महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी सरकार काम करत आहे.
Gold Silver Rate Today | बजेटपूर्वी सोने-चांदीच्या भावात मोठी अपडेट
३. आमच्या सरकारच्या काळात मागील १० वर्षांत देशाचा सकारात्मक आणि सर्वांगीण विकास झाला. ‘सबका साथ सबका विकास’ हाच आमचा मंत्र. आमच्या सरकाराने देशाच्या लोकांसाठी व्यापक विकासाची कामं केली आहेत.
४. देशाच्या सकल विकासाकडे सरकारचे विशेष लक्ष असून, महिला सशक्तीकरणावर सरकारने भर दिला आहे. गेल्या १० वर्षांत महिला या देखील आता उच्च शिक्षण घेत आहेत. तसेच पीएम आवास योजनेतील ७० टक्के घर ग्रामीण भागातील महिलांना देण्यात आले.
५. देशातील युवा वर्गाला सशक्त करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू असून, ३ लाख कोटींचा शेती क्षेत्रातून सरकारला फायदा होत आहे.
६. देशात राबविलेल्या जीएसटी प्रणालीमुळे ‘एक देश, एक बाजार’ ही संकल्पना यशस्वी झाली. संपूर्ण देशभरात ३९० नवी विद्यापीठे, नवे ३ हजार ITI सुरू करण्यात आले.
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक
७. गरीब महिला, तरूण व शेतकरी हे आमच्या केंद्रस्थानी असतील. त्यांच्या गरजा, आकांक्षा या आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत.
८. देशातील २५ कोटी गरिब लोकांना गरीबीरेषेतून वर काढण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
९. पूर्वेकडील राज्यांचा विकास ही प्राथमिकता असून, त्यासाठी नवीन योजना राबविणार.
१०. मोफत वीज देणे हे मोदी सरकारचे पुढील लक्ष.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम