विकी गवळी – प्रतिनिधी | चांदवड : तालुक्यात दुष्काळाचा आणखी एक बळी गेला आहे. चांदवड तालुक्यातील शिंगवे गावात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. ‘चिंधू गुंड’ असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नाशिकच्या चांदवड येथील शिंगवे गावात ‘चिंधु गुंड’ या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या पूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. नापिकाला कंटाळून नैराश्येपोटी आणि सतत कर्जबारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचे समोर आलेले आहे.
Gram Panchayat Election Result | नाशकात दोन्ही पवारांचे खाते उघडेना
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने दुष्काळाची अंतिम यादी प्रसिद्ध केलेली होती. त्या नुसार १५ जिल्ह्यातील ४० तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार २४ तालुक्यात गंभीर तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झालेला आहे. या दुष्काळतील पहिला बळी चांदवड तालुक्यात गेल्याने चांदवड तालुक्यातील शेतकरी शासनाबाबत नाराजी व्यक्त करत आहे.
breaking news | देवळ्यातून पहिला निकाल हाती; बघा कोणाचे उघडले खाते
यापुर्वी नाशिक जिल्ह्यात दुष्काळाचा पहिला बळी
यापुर्वी नाशिक जिल्ह्यात दुष्काळाचा पहिला बळी गेल्याची शासन दप्तरी नोंद करण्यात आली आहे. चांदवड तालुक्यातील खेलदरी येथील शेतकरी संतोष निवृत्ती ठोके यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संतोष ठोके यांची पाच एकर शेती असून त्यांनी खेलदारी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे दहा लाख, पिंपळगाव येथील सोसायटीचे नऊ लाख तसेच फायनान्सचे तीन लाख असे कर्ज त्यांनी घेतले होते. अनेक वर्षापासून अतिवृष्टी गारपीट यामुळे पिकांचे नुकसान होत होते. तसेच अपुऱ्या पावसाअभावी कोरडा दुष्काळ पडल्याने शेतात पीक घेता येत नव्हते. त्यामुळे कर्ज फेडायचे कसे? कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा? अशी विवंचना त्यांना होती यातूनच संतोष ठोके यांनी आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली होती. याप्रकरणी चांदवडच्या वडनेर भैरव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम