Breaking News | शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकत अजित दादांचा कृषीबहुल भागाचा दौरा, नाशिकसह दिंडोरी कळवणला भेटी देणार आहेत.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकदिवसीय नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत.आता या दौऱ्याला एक आणखी वेगळं वळण आलेलं आहे.(Breaking News)
नाशिकमध्ये अजित पवारांचा ताफा अडवला
नाशिकमध्ये कांदा आणि टोमॅटो उत्पादक आक्रमक झालेले आहेत.नाशिकमध्ये अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.अजित पवारांच्या ताफ्यासमोर कांदा आणि टोमॅटो फेकुन ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.शेतकरी उत्पादक पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे.दादांच्या या दौऱ्याला सुरु होताच गालबोट लागलेलं आहे.
Nashik | नाशिकमधील शेतकरी आक्रमक; टोमॅटो रस्त्यांवर फेकून देण्याची वेळ
या दौऱ्यामागील हेतु नक्की काय?
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे सातत्याने दौरे सुरूच आहेत. त्यातच नाशकत राजकीय केंद्र बनू पाहत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकदिवसीय नाशिक दौऱ्यावर आलेलेे आहेत. या दौऱ्यात त्यांचे नाशिक ग्रामीण भागात विशेष लक्ष लागलेलं आहे. उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर अजित पवार हे ‘शासन आपल्या दारी’ या सरकारी कार्यक्रमासाठी एकदा नाशिकमध्ये आलेले होते.
काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात राजकीय नेत्यांची उठबस वाढलेली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर आलेले होते. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष बांधणीसाठी नेत्यांचे दौरे करत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक जिल्ह्यात दौरा करत आहेत. यात विशेषतः ग्रामीण भागात लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. पक्ष कामकाजाच्या दृष्टीने त्यांचा हा पहिला दौरा मानला जात आहे. जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि बहुतांश पदाधिकारी दादा गटात सहभागी झाले आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने दादांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज ते नाशिकमध्ये आलेले आहेत.
Nashik | नाशिकमधील शेतकरी आक्रमक; टोमॅटो रस्त्यांवर फेकून देण्याची वेळ‘
नेमकं घडलं काय?
आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार ओझर विमानतळावर दाखल झाले. या ठिकाणी नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यानंतर शासकीय वाहनाने ते दिंडोरीकडे गेले.तेव्हाच कांदा आणि टोमॅटो उत्पादक आक्रमक झालेले आहेत.नाशिकमध्ये अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.अजित पवारांच्या ताफ्यासमोर कांदा आणि टोमॅटो फेकुन ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.शेतकरी उत्पादक पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे.दादांच्या या दौऱ्याला सुरु होताच गालबोट लागलेलं आहे. आता पुढील दादांचा दौरा आणखी काय वळण घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम