Maratha Morcha | गेल्या २० जानेवारीपासून मनोज जरांगे हे असंख्य मराठा बांधवांसह मुंबईकडे निघाले होते. आज नवी मुंबईत हे मराठ्यांचे वादळ धडकले असून, यामुळे सरकारलाही धडकी भरल्याचे दिसून आले. सरकारकडून सकाळपासून वेगाने सूत्र फिरवले गेले. सरकारचे शिष्टमंडळ हे जरांगे यांच्या भेटीला आले होते. नुकतीच त्यांची तब्बल एक तास मनोज जरांगेंशी चर्चा झाली असून, ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांसोबत चर्चा कारणार असल्याचे सांगितले. (Maratha Morcha)
मराठा समाजाला सरसकट आरक्षण ओबीसीतून आरक्षण मिळावे. तसेच ज्यांचे कुणबी पुरावे आहेत त्यांच्या सगे-सोयऱ्यांनाही कुणबी म्हणून आरक्षण दिले जावे अशी प्रमुख मागणी होती. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेआधी मनोज जरांगे यांनी वकिलांसोबतही चर्चा केली होती. कुठलाही निर्णय मी एकटा घेऊ शकत नसून, मी माझ्या समाजासोबत चर्चा करेल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. यावेळी त्यांनी समाजासमोरच ते सुधारित जीआर वाचून दाखवणार आहेत.
Maratha Morcha | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आजच तोडगा निघणार..?
मला माझ्या समाजाच्या माय बापासोबत बोलू द्या
यावेळी ते म्हणाले की,”मी फक्त त्यांनी सांगितलेलं सर्व ऐकलं आणि म्हटलं की आधी मला माझ्या समाजाच्या माय बापासोबत बोलू द्या मग ठरवू”. असं यावेळी जरांगे म्हणाले. याठिकाणी मराठा समाजाची अलोट गर्दी जमली आहे. त्यामुळे उपलब्ध साऊंड सिस्टम कमी पडत असून, प्रत्येकापर्यंत आवाज पोहोचला पाहिजे. गाईसमज फार वाईट असतो. त्यामुळे जरांगे यांची आणखी एक तासाने म्हणजेच २ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी येथे मराठा समजासोबत चर्चा करणार असून, ही जाहीर सभा होणार आहे. तसेच यावेळी ते म्हणाले की, आपण आता येथून आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. आपल्याला सरकारने दिलेल्या जीआरवर चर्चा करायची आहे. हा जीआर मी समाजाला वाचून दाखवणार आहे
Manoj Jarange mumbai rally | झोपेत पोलिसांनी सह्या घेतल्या; जरांगेंनी केले आरोप
Maratha Morcha | काय म्हणाले दिपक केसरकर..?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना, शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले की, सरकारने मराठा समजच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाची आणि मनोज जरांगे यांची चर्चा ही सकारात्मक झाली आहे. जरांगे यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. या निर्णयात जरांगे पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे. तरी त्यांनी सहकार्य करावे, अशी विनंती यावेळी दिपक केसरकर यांनी मराठा समाजाला आणि जरांगे यांना केली आहे. (Maratha Morcha)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम