Breaking | एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या; तिला संपवुन तरुणाची गळफास घेत आत्महत्या

0
22

Breaking | पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात शुक्रवारी म्हणजेच काल दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे.  बारावीत शिकणाऱ्या एका तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आली.  हि हत्या त्या मुलीच्या कथित प्रियकराने केल्याचं देखील आता समोर आलेलं आहे. कोयत्याने वार करत हि हत्या केल्याचे वृत्त आता समोर आलेलं आहे. या मुलीच्या कथित प्रियकराने या तरुणीची हत्या करत घटनास्थळावरून पलायन केले आहे.  पोलिसांनी त्या मलाच्या शोधासाठी विविध पथके तयार केलेली आहेत.(Breaking)

Big News | पन्हाळगडावर अचानक आले पोलीस; प्रेमीयुगुलांची उडाली तारांबळ

या तरुणाने त्या तरुणीची हत्या करीत रात्रीच गळफास घेत स्वतःही आत्महत्या केली आहे. अर्चना उदार (वय वर्ष 18) असे हत्या झालेले तरुणीचे नाव आहे.  प्रभाकर वाघिरे हे आरोपी तरुणाचे नाव आहे.हे प्रकरण एकतर्फी प्रेमातून तरुणाने  तरुणीची गळा चिरून हत्या केल्याने सर्व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अर्चना हि रयत शिक्षण संस्थेच्या अनुदानित आश्रम शाळेत बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तर आरोपी प्रभाकरचे अर्चना सोबत एकतर्फी प्रेम होते. माझ्या प्रेमाचा स्वीकार कर असे म्हणत प्रभाकर हा अर्चनाला नेहमी त्रास देत होता. पण अर्चना कडून त्याला नेहमी नाकार येत होते. अर्चना नेहमीप्रमाणे कॉलेजला जात असताना प्रभाकर यांनी तिचा पाठलाग करत माझ्या प्रेमाचा स्वीकार कर असे म्हणत रागाच्या भरात हातात असलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर वार करत तिची हत्या केली. अर्चनाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पुढील अधिक तपास मोखाडा पोलीस करत आहेत.

Pune News | पुण्यातील माजी नगरसेविकेला धमकावून मित्राने केला अत्याचार

काही दिवसांपुर्वी पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या तरुणीवर झाला होता भररस्त्यात कोयत्याने वार

पुण्यातील सदाशिव पेठेत एका तरुणीवर एका तरुणाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. पण दोन तरुणांमुळे त्या मुलीचे प्राण वाचले.पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.  काही दिवसांपुर्वी पुण्यातील मध्यवस्ती असलेल्या सदाशिव पेठेच्या परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला होता. सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस स्टेशनच्याजवळ एका एमपीएससी(MPSC) करणाऱ्या तरुणीवर एका तरुणाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. दिवसाढवळ्या अशा घटना घडत असल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आल्याचं पहायला मिळत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here