Breaking | प्रतिनिधी-विकी गवळी : चांदवड येथे सोमवारी (दि. 11) डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत केंद्र सरकार विरोधात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग रास्ता-रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मा. आमदार उत्तम भालेराव आणि तालुका प्रमुख सयाजी गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. (Breaking)
Onion News | भारती पवारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; शेतकऱ्यांची मागणी
गुरवारी (दि. 7) रात्री केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी घातल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. 8) मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग अडवत आंदोलन केलेले होते. या आंदोलनात शेतकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता.
Onion Issue | कांदा निर्यात बंदी संदर्भात धोरण तात्काळ मागे घ्या; आ. डॉ. राहुल आहेर यांची मागणी
आज (दि. 9) चांदवड येथे नवीन शासकीय विश्रामगृह येथे माजी आमदार उत्तम भालेराव यांच्या उपस्थितीत हे आंदोलनाची माहिती जाहीर करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष प्रकाश शेळके, रिजवान घसी, जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, नगरसेवक नवनाथ आहेर, दत्ता वाघचौरे, सुखदेव जाधव, टोपे सर, अनिल भोकनळ, डॉ. शाम जाधव, अनिल ठोके, कैलास सोनवणे, विक्रम जगताप, विकी जाधव, गोरख शिंदे, संजय साठे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम