आमीर आणि अक्षयला बसला “बायकॉट”चा फटका ! दोन्ही चित्रपट ठरले…

0
15

मुंबई – गेल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर आमीर खानचा ‘लालसिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ प्रदर्शित झाला होता. मात्र सध्या जोरदार सुरु असलेल्या ‘बायकॉट बॉलीवूड’ मोहिमेमुळे ह्या दोन मोठ्या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर जबर फटका बसला आहे.

मागच्याच आठवड्यात ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाले. दोन्ही सिनेमातील कलाकारांनी दणक्यात प्रमोशनही केले खरे, पण शेवटी प्रेक्षकवर्गच नाराज झाल्यामुळे या सिनेमांनी अपेक्षित कमाई केली नाही. अनेक ठिकाणी प्रेक्षकच न आल्याने ह्या सिनेमांचे शो रद्द करण्यात आले आहेत, काही ठिकाणी तर मर्यादित तिकिटांची विक्री झाल्यावरच शो सुरु केला जात आहे. नेटकऱ्यांकडून मात्र ‘बायकॉट बॉलीवूड’चा परिणाम झाल्याचा दावा केला जात आहे.

आमीर खानच्या लाल सिंग चड्ढाने सोमवारपर्यंत बॉक्स ऑफिसवर ४५.७५ कोटींची कमाई केली होती, तर मंगळवारी सिनेमाने अवघा २ कोटींचा गल्ला जमवला आहे. अर्थातच ६ दिवसात केवळ ४७.७५ कोटी जमवण्यात सिनेमाला यश आले आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शित झाल्यानंतर दुसर्‍या दिवशीच थिएटर मालकांनी सिनेमाचे तब्बल १३०० शो रद्द केले होते. तिकडे अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ सिनेमाची परिस्थिती देखील काही वेगळी नाही. ‘लाल सिंह चड्ढा’सोबतच ‘रक्षा बंधन’ही गुरुवारी रिलीज झाला. मात्र या सिनेमाची अवस्था तर “लाल सिंग…” पेक्षाही वाईट आहे. सिनेमाने मंगळवारी केवळ १.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर एकूण कमाई ६ दिवसात ३५.१५ कोटी रुपये इतकीच आहे. रक्षाबंधनचे देखील जवळपास १००० शो रद्द करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे, कमी बजेट असलेल्या ‘कार्तिकेय २’ या दाक्षिणात्य सिनेमाने बॉलिवूडच्या दोन बिग बजेट सिनेमांना मागे टाकले आहे. तेलुगू अभिनेता निखिल सिद्धार्थचा ‘कार्तिकेय २’ सिनेमा शनिवारी प्रदर्शित झाला मात्र या सिनेमाने सोमवारी ६.५० कोटींची कमाई करत तीन दिवसांत १७.५५ कोटींची कमाई केली आहे. ‘कार्तिकेय २’ची निर्मिती अवघ्या १५ ते २० कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली तरीही हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून चित्रपट मालकांनी ह्या सिनेमाचे शोज वाढवले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here