द पॉईंट नाऊ ब्युरो : औरंगाबाद (संभाजीनगर) येथे एका बॉम्बस्फोटने लोकांची झोप उडवल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्ह्याच्या कन्नड मध्ये एका फर्निचरच्या दुकानात हा बॉम्बस्फोट घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्ह्यातील कन्नड येथे एका फर्निचरच्या दुकानात कुणा अज्ञाताने कसली तरी वस्तू ठेवली होती. त्याबद्दल संशय बळावल्याने वेळीच बॉम्ब शोधक व बॉम्ब नाशक पथकास पाचारण करण्यात आले. त्यांनी तपासले असता, तो बॉम्बच असल्याचे निष्पन्न झाले. मात्र हा बॉम्ब निष्क्रिय करतांना त्याचा स्फोट झाला. मात्र सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
देशात सध्या असलेल्या वातावरणामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. दहशतवादी संघटनेने भारतात महत्वाच्या शहरांत घातपाताची धमकी दिली आहे. तर खलिस्तानवादी संघटनेच्या काही कृत्यांमुळे ते काही घातपात करण्याचा देखील संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा सर्वच ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा बघत आहेत.
कन्नड येथे आपले फर्निचरचे दुकान असलेले किरण राजगुरू यांना दुकान उघडले असता, एक मोबाईल बॉक्स दिसला. त्यांनी तो खोलून पाहिला असता त्यात एक बॅटरी आणि वायर जोडलेली वस्तू दिसली. त्यांनी त्वरित पोलिसांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर ही वस्तू बॉम्बच असल्याचे समोर आले.
औरंगाबादमध्ये (संभाजीनगर) सापडलेल्या आणि स्फोट झालेल्या या बॉम्बमुळे सुरक्षा यंत्रणा अजून सतर्क झाली आहे. हा बॉम्ब इथे कोणी तयार केला आणि इथे का ठेवला, याचा तपास करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम