बेवड्यानों शरीराची तपासणी करून घ्या; देवळ्यात बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्यावर पोलीसांची धाड

0
29
देवळा / डोंगरगाव ता देवळा येथे बनावट दारू बनविण्याचे साहित्य जप्त करतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व इतर कर्मचारी (छाया - सोमनाथ जगताप)

देवळा ; जिल्ह्यातील अवैध दारू विक्री उत्पादनांची ठिकाणे उध्वस्त करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीसांनी मागील काही महिन्यांपासून व्यापक शोध मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सोमवारी दि २५ रोजी देवळा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात बनावट दारू बनविणा-या कारखान्यावर धाड टाकून आरोपींविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळा डोंगरगाव ता देवळा येथे बनावट दारू बनविण्याचे साहित्य जप्त करतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व इतर कर्मचारी छाया सोमनाथ जगताप

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दि २५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार देवळा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात काही इसम हे एका शेतातील शेडमध्ये अवैधरित्या बनावट देशी व विदेशी दारू बनविण्याचा कारखाना चालवत असल्याची माहिती मिळाली होती .

त्यानुसार ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकातील पोलीस निरीक्षक दत्ता काभिरे यांच्या पथकाने डोंगरगाव शिवारात संशयीत कैलास आहिरे यांचे शेतातील घराच्या पाठीमागे असलेल्या शेडमध्ये धाड टाकली असता याठिकाणी कैलास मुरलीधर आहिरे, प्रतिक कैलास आहिरे, दोघे रा. डोंगरगाव, ता. देवळा हे स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदा बनावट देशी व विदेशी दारू तयार करत असल्याचे आढळून आले. बनावट दारू ही मानवी जिवीतास हानिकारक असल्याचे माहीत असतांना देखील, वरील दोन्ही इसम हे सदर ठिकाणी बनावट देशी व विदेशी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व साधने, तसेच दारू विकी व वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे चारचाकी वाहनासह मिळून आले आहे.

सदर छापा कारवाईत बनावट देशी व विदेशी दारू भरण्यासाठी लागणा-या विविध कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्या, झाकणे, रिकाम्या बाटल्यांमध्ये मद्य भरण्यासाठी लागणारे मशीन, बाटलीचे सिल, झाकण पॅक करण्यासाठी लागणारे मशीन, बॉटलींग कंपनीचे बॉक्स व लेबल्स, बाटल्यांवर बॅच नंबर्स टाकण्यासाठी वापरण्यात येणारे रबरी शिक्के, देशी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, प्लॅस्टिकचे ड्रम, प्रिन्स संत्रा व इम्पेरियल ब्लू कंपनीच्या मद्य भरलेल्या २२३ बाटल्या तसेच वाहतूक व विक्री करण्यासाठी वापरण्यात येणारे होण्डा बी. आर. व्ही. वाहन असा एकूण १०,०५,०४४/- रूपये किमतीचा . मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यातील दोन्ही आरोपींविरुध्द देवळा पोलीस ठाण्यात भादवि कलम ३२८ सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली असून, अवैद्य दारू बनविणाऱ्या व विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. सदर आरोपी हे मागील काही महिन्यांपासून बनावट दारूचा कारखाना चालवित असून सदर ठिकाणी देशी प्रिन्स संत्रा, प्रिन्स भिंगरी, टॅगो पंच, इम्पेरियल ब्लू, मॅकडॉवेल्स नंबर १ या कंपन्यांची दारू बनवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सदर आरोपीविरुद्ध यापुर्वी देखील देवळा, सटाणा,सुरगाणा पोलीस ठाण्यांमध्ये दारूबंदी कायद्याखाली गुन्हे दाखल आहेत. ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे केदार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक . हेमंत पाटील यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक . दत्ता काभिरे, पोलीस नाईक संतोष थेटे, पोलीस कॉन्स्टेबल नारायण करवर, धनंजय देशमुख, मनोज सानप, महिला पोलीस कॉन्स्टेबल कल्पना लहांगे, चालक गोपीनाथ बहिरम यांचे पथकाने सदर छापा टाकून कारवाई केली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here