Blood letter : सत्ताधाऱ्यांच्या गोंधळात उद्विग्न होऊन औरंगाबादच्या तरुणाने अंबादास दानवे यांना होऊन रक्ताने लिहिले पत्र.
१७ जुलैपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहेत. या अधिवेशनात मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या महिला अत्याचार संबंधित घटनांवर चर्चा करावी,अशी विनंती दीपेश पाटील या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे रक्ताने पत्र लिहून केली आहेत.
या पत्राची दखल घेत विरोधी पक्ष नेत्यांनी आगामी अधिवेशनात नक्कीच हा प्रश्न मांडला जाईल,असे सदरील तरुणांला आश्वासन दिले आहेत.या पत्राला आपल्या सोशल मीडियावर शेअर करत दानवे यांनी, तरुणाला असे रक्ताने पत्र लिहू नये अशी विनंती केलेली आहेत. आपले विनंतीची नक्कीच दखल घेण्यात येईल,असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते यांना लिहिलेल्या पत्रात दीपेश पाटील या तरुणाने लिहिले की, आपण बघत असाल की गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यांमध्ये महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले आहेत.विशेष बाब म्हणजे सदरील सर्व घटना प्रेमप्रकरणातून घडलेले आहेत. मुलींना एकतर्फी प्रेमातून विहिरीत, नाल्यात मारून फेकून दिले जात आहेत.खरंतर आपल्याकडे राजकीय अस्थिरतेतीच जास्त चर्चा केली जात आहेत परंतु महिलांच्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी आपणास विनंती करतो की,सबब घडणाऱ्या घटनांवर अंकुश कसा लावता येईल याकडे तुम्ही लक्ष द्या. नाहीतर आगामी काळात महिलांवरील या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.त्यानंतर आपल्या सर्वांच्या हातून ही परिस्थिती बाहेर जाईल. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात यावर गंभीर चर्चा करावी अशी विनंती त्यांनी केली आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम