भाजपा युवा मोर्चा देवळा तालुक्याची जंबो कार्यकारिणी जाहीर

0
22
भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनानियुक्ती पत्र देतांना जिल्हाध्यक्ष केदा आहेर समवेत ,सचिन दराडे ,नानू आहेर आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष योगेश (नानू)आहेर यांनी आज (दि २२) रोजी तालुका कार्यकारिणी जाहीर केली असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनानियुक्ती पत्र देतांना जिल्हाध्यक्ष केदा आहेर समवेत ,सचिन दराडे ,नानू आहेर आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

कार्यकारणी पुढीलप्रमाणे

देवळा शहर अध्यक्ष – सार्थक मनोज आहेर ,उपाध्यक्ष तुषार आहेर, हर्षद मोरे, वैभव आहिरे, ज्ञानेश्वर आढाव, सरचिटणीस -समाधान सोनजे ,चिटणीस- सागर खरोले, सुनील सोनवणे, गटप्रमुख ; रवींद्र चव्हाण – वाखारी, किशोर निकम – विठेवाडी
गण प्रमुख ; रोशन शिरसाठ – मेशी, सचिन नांदगे वाजगाव, योगेश निकम – वाखारी, सागर भालेराव – लोहोणेर, प्रवीण आहिरे – खालप याप्रमाणे आहे.

याप्रसंगी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन दराडे ,संघटन सरचिटणीस सुरेश पिंगळे ,युवा तालुकाध्यक्ष योगेश आहेर, भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण, माजी उपसरपंच नदिश थोरात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत व पक्ष बळकटी करणासाठी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याकामी परिश्रम घ्यावेत असे आवाहन जिल्हाध्यक्ष सचिन दराडे यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here