देवळा तालुक्यात बारा ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे थेट सरपंच पदाचे उमेदवार विजयी

0
53

देवळा : तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १२ ठिकाणी भाजपचे थेट सरपंच पदाचे उमेदवार निवडणूक आले आहेत . तालुक्यातील सार्वत्रिक तेरा ग्रामपंचायतीसाठी रविवारी दि १८ रोजी मतदान झाले .

देवळा सटवाईवाडी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदी भाजपचे चंद्रकांत आहेर निवडणूक आल्यानंतर जल्लोष करतांना समर्थक कार्यकर्ते (छाया – सोमनाथ जगताप )

यात फुलेनगर ,वासोळ ,भऊर , खामखेडा, मटाणे, विठेवाडी ,डोंगरगाव ,वाजगाव ,कणकापुर ,श्रीरामपूर ,सटवाईवाडी ,चिंचवे व दहिवड या गावांचा समावेश आहे . आज मंगळवारी देवळा तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणी झाली. यात सर्वाधिक १२ ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे थेट सरपंचपदा सहा सदस्य निवडून आले. सर्व विजयी उमेदवार व पॅनलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली.

भाजपा विचाराच्या सर्व विजयी उमेदवारांचे आमदार डॉ राहुल आहेर ,भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी अभिनंदन केले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here