द पॉईंट नाऊ विशेष ; देवळा नगरपंचायत निवडणूक रणधुमाळीत इच्छुकांची तिकीट मिळविण्यासाठी चांगलीच दमछाक सूरु आहे. भाजपा तर्फे इच्छुकांची गर्दी जास्त आहे तर महाविकास आघाडीतर्फे मात्र इच्छुकांची उदासीनता आहे. आज अर्ज भरण्याच्या पहिल्यादिवशी कोणीही आपला उमेदवारी अर्ज भरलेला नाही.
वॉर्ड क्रमांक 15 मध्ये भाजप तर्फे इच्छुक उमेदवार सुनंदा साहेबराव आहेर तर अपक्ष म्हणून सरोज आहेर ह्या तयारीत आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार शांताराम तात्या आहेर यांचे चिरंजीव लक्ष्मीकांत आहेर , गोविंद आहेर, सुधाकर आहेर, किशोर आहेर हे उमेदवार रिंगणात उभे ठाकले होते . यात लक्ष्मीकांत आहेर विजयी झाले . तर दुसऱ्या स्थानावर किशोर आहेर हे होते.
किशोर आहेर यांना गेल्यावेळी दोन नंबरची मते मिळाली होती. याची सहानुभूती व आमदार डॉ राहुल आहेर यांचे समर्थक व भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून किशोर आहेर यांच्या कडे बघितले जात असल्याने त्यांच्या मातोश्री प्रबळ दावेदार असतील असे मानले जात आहेत .
तर दुसरीकडे नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत आहेर यांच्या पत्नी सरोज आहेर रिंगणात उतरणार आहेत . त्या माजी आमदार शांताराम तात्या आहेर स्नुषा असून, त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी करणार असल्याचे सांगितले . या प्रभागात दुरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत .
राष्ट्रवादीची मात्र या वॉर्डात अद्याप चाचपणी सुरू असल्याचे चित्र आहे, अजून कोणीही इच्छुक म्हणून समोर आलेले नाही, या वॉर्डात राष्ट्रवादी उमेदवार देणार की नाही हे बघणे महत्त्वाचे आहे.
या वॉर्डात लक्ष्मीकांत आहेर यांनी गेल्या वेळी बाजी मारत उपनगराध्यक्ष पदा पर्यंत मजल मारली मात्र या कार्यकाळात नेमके कोणते काम केले हे जनतेला उत्तर द्यावी लागणार आहेत, या वॉर्डातील विकासाबरोबरच बाकी समीकरण देखील महत्वाचे ठरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपाचे निष्ठावंत भाजपा युवा मोर्चाचे किशोर आहेर हे आ.आहेर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात, गेल्यावेळी त्यांना अपक्ष असूनही दोन नंबरची मते मिळाली, कोरोना काळात त्यांनी केलेली सामाजिक कामे तसेच त्यांचा असलेला जनसंपर्क ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
सुनंदा आहेर विरुद्ध सरोज आहेर यांच्यात दुरंगी लढत झाल्यास सामना रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. किशोर आहेर यांच्या मातोश्री सोबत सहानुभूतीची लाट असेल तर सरोज आहेर यांना केल्या पंचवार्षिक निवणुकीत केलेले कामे दाखवावे लागणार आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
श्री.अमोल आहेर याच्या मातोश्री सुचिता महारू आहेर या सुद्धा वार्ड क्रमांक पंधरा मध्ये इच्छुक आहेत .त्यांच्याकडे कामाचा अनुभव अमोल आहेर यांनी व राजेश आहेर यांनी वार्डात केलेली व देवळ्या गावात केलेली विकासाची कामे हे सर्वांना माहिती आहे .त्याचबरोबर कै. महारू वामन आहेर यांच्या त्या पत्नी आहेत