बिग बॉस मराठीचे चौथे सीजन लांबले, हे आहे कारण…

0
10

मुंबई – टीव्हीवरचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो बिग बॉस मराठीचा चौथा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच शोच्या आगामी सीजनची घोषणा करण्यात आली होती. सगळ्यांनाच ह्याची उत्सुकता आहे, की यंदा बिग बॉसच्या घरात कोण कोण असणार ? मात्र, हा शो सुरु होण्यास थोडा विलंब लागणार आहे.

https://www.instagram.com/tv/CgZcnBgD1ny/?utm_source=ig_web_copy_link

सूत्रांनुसार हा शो सप्टेंबरच्या सुरूवातीला सुरू होणार होता. मात्र, आता ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याचे सांगण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे, सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा माहोल आहे. त्यामुळे एकतर यंदाच्या सीजनला उशीर होणारच आहे. मात्र अद्यापही बऱ्याच कलाकारांनी आपला निर्णय कळवला नसल्यामुळे स्पर्धकांची लिस्टही तयार झालेली नाही. मात्र, प्रॉडक्शन हाऊसने शोची तयारी सुरू केली असून सध्या बिग बॉसच्या घराचे काम प्रॉडक्शन हाऊसतर्फे सुरु आहे.

मागील सर्व सीजनप्रमाणे यंदाही दिग्दर्शक महेश मांजरेकरच शोचे सूत्रसंचालन करणार आहे. गतवर्षी आजारपणामुळे महेश मांजरेकर काही भागात दिसले नव्हते, त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावल्या जात होत्या. मात्र ह्या चर्चांवर अखेर चॅनलने पूर्णविराम दिला आहे. विशेष म्हणजे, यंदा सामान्य माणूसही बिग बॉसच्या घरात असणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here